Thursday, November 14, 2019

EDUCATION and rites

शिक्षण 
                       शिक्षण म्हणजे दररोज शाळेत जाणे ,एका रांगेत बसणे ,एका रेषेत लिहिणे ,पुस्तक वाचणे म्हणजे शिक्षण हे आपले प्राथमिक मत......
                      परंतु या व्यतिरिक्त चार भिंतीच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात शिक्षणाची व्याख्या व्यापलेली आहे. जे असे शिक्षण ज्याला कोणतेच बंधन नसते . जे शिक्षण शिकल्यावर आनंद तर देतेच, त्याचबरोबर उपजीविका, सृजन,मदत, साक्षात्कार या ज्ञांनांना एक विशेष अर्थ उपलब्द करून देते. या ठिकाणी शिक्षण देणारा व शिक्षण घेणारा या दोघांकडे अहंकार नसतो. अहंकार नसण्यामागे कारण म्हणजे जे माहीत आहे त्यापेक्षा माहीत होण्यासारखे असे अफाट ज्ञान की जे या आयुष्यात कवटाळणे शक्य नाही हे त्या दोघांना समजलेले असते.

 पंचेंद्रियांमुळे जे ज्ञान होते त्याही पलीकडे काही आहे ,अशी जाणीव होते तेव्हा शिक्षणाचे फलित मिळाले म्हणणे वावगे ठरणार नाही.
                       शिकवावे कसे हे शिकवणारी अनेक शाळा,महाविध्यालये जगात आहेत. पण शिकावे कसे हे मात्र जणूकाही सर्वांना जन्मजात माहीत असते असे समजले जाते. नुकतेच जन्मलेले मूल दोनच वर्षात चालायला, बोलायला लागते ते आपले आपणच. कुणीही त्याला शिकवत नाही. त्याला बोलता यावे करिता व्याकरण संगितले जात नाही. तरी ते बोलते वस्तु, माणसे, भावना ओळखता येतात. असे म्हणतात आपण जे काही शिकतो त्यातले निम्म्यापेक्षा जास्त ते बालपणातच शिकून जाते. सर्वकाही माहिती असतांना त्याला योग्य-अयोग्य, चांगले-वाईट यातला फरक अथवा मार्गदर्शन आवश्यक असतांना आपण मात्र त्याला दडपण टाकून खूप सारे वदवून घेतो. अशात त्यांने प्रोत्साहन दिले नाही तर बदडायला लागतो.
                        पहिल्या दोन-तीन वर्षात ज्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप असते, तेच मूल नियमांच्या शालेय वातावरणात प्रवेश करतेवेळी अवघडल्या सारखे वावरते. सहज मिळणारे शिक्षण आणि नियमांच्या चौकटीत,चार भिंतीच्या आत मिळणारे शिक्षण यात ते समायोजन साधत नाही. म्हणूनच शासन नवनवीन नियमांची निर्मिती करण्यास भाग पडले असावे. आनंददायी शिक्षण त्यातलेच एक. 

आज हे सर्व सांगण्यामागचे कारण म्हणजे आजच्या लेखात वापरलेले फोटो जे माझ्याच हातून capture झालेले. ज्यात शिक्षणाचा आनंद भरभरून आहे. माझ्या अनुभवातले.......
                    म्हणतात शिकण्यासाठी विशेष वेळ अथवा ठिकाणची गरज नसते. फक्त मनात ध्यास असावा लागतो. ध्यास संबंधित एक उदाहरण असे.......
                           एखादी गोष्ट शिकायचा ध्यास घेतला की एकलव्य फक्त पुतळ्याकडून सारी धनुर्विध्या शिकू शकतो, हा इतिहास सर्वांना महिती आहे. परंतु शिकण्याचा ध्यास किव्हा इच्छाच नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष Albert_Einstein कडून देखील काहीच शिकू शकत नाही.
 हा ध्यास उत्पन्न झाल्याशिवाय जीवनातील सर्वप्रकारच्या शाळेचे शिक्षण अशक्य आहे. हे विध्यार्थी व पालकांना समजणे किती आवश्यक आहे. नाहीतर नुसतेच घेतलेले शिक्षण किती भयंकर आहे, हे तुम्ही समजू शकता.

              बालपणतील नियमांच्या पलीकडच मुक्त शिक्षण किव्हा आयुष्यातील अनुभवाच्या मिळणार्‍या शिक्षणाची मजा वेगळीच असते. खरच आयुष्यभर शिकत राहणे यासारखी दुसरी मजेदार गोष्टच नाही.
           आपल्यापेक्षा लहान मूल कितीतरी जास्त छान गात असतात, वाजवत असतात, चित्रे काढत असतात. आपल्याला येत नाही असे समजते तेव्हा आपणहून शिकवतात. त्यांच्या कडून शिकण्यासारखी दुसरी मजाच नाही. इतके सोपे आणि सुंदर कुणीच शिकवू शकत नाही.
          आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काहीतरी शिकायला मिळते. ते घेत जावे म्हणतात.....कारण शिकत राहिल्यामुळे जीवनात ऊर्जा वाढत राहते. थकल्याची कोणतीच जाणीव तुम्हाला जाणवणार नाही. हे शिक्षण पूर्ण मुक्त आणि आनंददायी असल्यामुळे आणि पुर्णपणे वैयक्तिक असल्यामुळे यात कुणालाही त्रास होण्याची कोणतीच शक्यता नसते. परिसरातील बाह्य गोष्टीचा विनाकारण त्रास करून घेणे बंद होते. ऊर्जेचा अफाट संचय झाल्यामुळे काहीतरी योग्य सुरू आहे याची जाण होते. याहून आनंददायी काय असू शकते.

                 
                     

6 comments:

 1. खूपच सुंदर ....या blog वरचे विविध प्रकारच्या विषयावरील लेख वाचले.लेख वाचताना मला तुझा अभिमान वाटला.इतके सुंदर विचार असलेले अप्रतिम लेख आहेत .हे लेख लोकांच्या पुढे येऊ देत.अशा सुंदर लेखाच एक संग्रह असलेले एक पुस्तक होऊन जाऊ दे.....वाचायला खूपच मज्जा येईल .आणि सर्व लेख प्रेरणादायी आहे .....🖋✍🏻✍🏻✍🏻.👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks bro. तुझा reply खुप सारे प्रोत्साहन देतोय.

   Delete
 2. जे वास्तव आहे पण त्याकडे दुर्लक्ष्य होत आहे. माणूस मरेपर्यंत विध्यार्थी असतो हे आपण कितीदा वाचतो पण चिंतन न करता विसरतो. माणूस मरणाच्या वेळेस शेवटचा श्वास घेतो तेव्हा तो पुढचा श्वास कसा घ्यावा हे शिकतो
  तुमचा लेख वास्तव रिमाइंड करणारा आहे

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks sir.....म्हणजे वैचारिकता योग्य मार्गावर आहे म्हणावं..

   Delete
 3. ' कला' या शब्दातच खूप मोठी शक्ती ,खूप मोठा व्यापक अर्थ दडलेला आहे, जो फार कमी लोकांना समजतो. कलेचे प्रकार किती? असे म्हटले तर याचे उत्तर कोणीही देऊ शकणार नाही, कोणाला बोलण्याची कला तर कोणाला हसण्याची.. भाषणाची.. लेखनाची... मला तर म्हणावेसे वाटते की "सर्वांना जर जगण्याची कला अवगत झाली असती तर आज या जगात कोणीही दुःखी राहिला नसता". उत्तम जीवन जगणे ही देखील कला आहे ज्याला हे जमलं तो सुखी, त्यांनी दुःखात सुख आणि असंतोष मधून समाधान शोधुन जीवन आनंदाने जगला असता आपलं संपुर्ण जीवन कलेने एका सुंदर नक्षिप्रमाणे साजविले असते. मलाही सरांप्रमाणे लहानपणी संगीताची आणि चित्र कलेची आवड होती पण आता त्याचा भूतकाळ झाला. सर्वांनी आपापली कला जपली पाहिजे आयुष्य नक्कीच ऊठुन दिसेल

  ReplyDelete
  Replies
  1. खुप अर्थपूर्ण reply दिला सर... धन्यवाद

   Delete