Sunday, November 17, 2019

संवाद किती महत्वाचा...how imp.communication

संवाद किती महत्वाचा....
                          चांगला संवाद communication म्हणजे खरं, स्पष्ट,गोड, मार्गदर्शक,आपुलकीच आणि प्रोत्साहन देणारं असणे किती महत्वाचे. आपल्या शरीराची गरज म्हणून आपण खातो-पितो, आणि पचन व्हावे म्हणून थोडा फेरफटका मरतो. जेणेकरून कोणते गंभीर आजार होऊ नये म्हणून. मनाचही तसच आहे. त्याला आजार होऊ नये करिता संवाद अत्यंत गरजेचं.
communicate,communication,how to improve communication skills,information and communication technology,how to,communications,communication coach,nta net communication,communication basics,communication system,communication skills,ugc net communication,savox communications,con-space communications,wireless communications,mobile communications,gd communication skills,communications gear
,lifestyle,new,old,social,calture,tech,
          एक काळ होता लोकं दिवसभरच्या कामातून वेळ काढून मित्र, शेजार,समवयस्क, समविचारी व्यक्तीशी दैनंदिन,भविष्य किव्हा जीवनविषयक चर्चा, हितगुज करत असत. या संवादासाठी विशेष वेळ ठरवली जात असे. निवांत दुपारी, संध्याकाळी भेट होत असे.

या भेटरूपी संवादातून भरपूर गप्पा व विचारांची देवाण-घेवाण होत असे.या संवादातून एकमेकांविषयी आदर,सन्मान निर्माण होत असे ,विचाराची ऊंची वाढत असे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत असे .

नेहमीच्या हितगुजातून होणार्‍या भेटीमुळे एक नवीन नाते तयार होत असे. कुटुंब, मित्रपरिवार, समाज विषयक चर्चातून समाजाभिमुखता जोपासली जात असे. नेहमीची भेट, भरपूर संवाद वेगवेगळ्या विषयावर चर्चा- यामुळे त्याविषयाची सखोल ज्ञान, सादरीकरण अशा अनेक प्रकारच्या ज्ञानात भर पडत असे.
        communication म्हणून प्रत्यक्ष भेट हाच एक पर्याय उपलब्द होता. हा पर्याय कित्येक रोगांवर रामबाण  उपाय होता. कुटुंबातील सण, सुख: दुख:चे कार्यक्रम असे अनेक कामे एकमेकांच्या मदतीने पार पडत असत. ये जमले नाही की इतरांना विचारणे कमीपणाचे वाटले जात नव्हते. कारण संवाद आणि प्रत्यक्ष भेट हे मुख्य कारण होते. कोणी ओळखीचे असो वा अनोळखी कुठे बसलेले असेल तर त्याची आपुलकीने त्याची विचारपूस केली जात असे . अशा संवादाने व्यक्तींना आधाराची जाणीव होते. कारण नसतानाही तासन-तास  मन हलक होईस्तव गप्पा होत असत. अशा संवादाने नातेसंबंध अधिक गट्ट होत असतात . 
         हा संवाद विशेषता आजारी व्यक्तींना तर प्रेरणाच देत असत. औषधाने बरा न होणारा रोग संवादाने सहज बरा होत असे. तसं अशा संवादाची आजही रोग्याना नितांत गरज आहे,परंतु संवादासाठी वेळच नाही ना? काय करता...... 
          खरच हा संवाद आज कुठेतरी हरवलाय रे. आजचे हे digital जग खूप सार्‍या नात्यांना छेद देत आहे. mobile ,laptop ,internet ही invisible world अदृश्य दुनियाने जगण्याच्या सर्व व्याख्याच बदलून टाकल्या . 
     उदाहरण म्हणून हा फोटो.
comm,motivation,digital,world,calture,life,lifestyle,new,tech,
      म्हणतात परिवर्तन जगाचा नियम आहे . त्यामुळे बदलत्या जगाला सामोरे जाणे आवश्यकच आहे. नाहीतर मागे राहण्याची भीती मनात घर करून राहते. आज सर्वच व्यवहार, खरेदी, शिक्षण, भेटी आणि सर्वच ऑनलाइन online झाल्याने एकमेकांना whatsApp, Facebook आणि इतर social network वरच भेटणे होऊन बसलेय. राहिले आपले संवाद, हितगुज, अन मनसोक्त गप्पा दुर्मिळच झाल्या. एखाद्या कामासाठी कोणाचा दरवाजा ठोठायची गरजच उरली नाही. मार्गदर्शन तर खूप दूर... सरळ net,youtube गेले की झालं. 
     आपल्या शाळा digital झाल्या, अभ्यासक्रम लावला की शिकतील पोरं online हे नवीन फॅड. तरी मार्गदर्शन तर लागेल ना? आहे की नाही? विध्यार्थांना समजून घेणे, प्रोत्साहन देणे हे तर माणूसच करू शकतो?  असो..... जर- तर बाजूला ठेऊया विचार करूया जीवनशैलीचा, कोणती प्रभावी वाटते. नवी-जुनी?
       तसं पाहिले तर सर्व समान म्हणूया...कारण यापूर्वी जी जीवनपद्धती लोकं जगले ते ही योग्यच,आणि आता आपण जगतोय ते ही योग्यच.प्रवाहात जगणे मजदारही असू शकते. जुनं- नवं चांगले-वाईट म्हणण्यापेक्षा जे आपल्या वैयक्तिक जीवनशैलीला शोभते ते स्वीकारूया. फक्त अतिरेक नसावा. अतिरेक वाढला म्हणजे आटोपले.
   इच्छा इतकीच की आपल्या निवडक हितचिंतक,मार्गदर्शक व मित्रांची साथ सोडू नका.भेटले की mobile बाजूला ठेऊया आणि मनसोक्त गप्पा मारूया . कदाचित या हितगुजातून, संवादातून एखादा शोध लागून जाईल, जो internet वर उपलब्ध नसेल. 

        लेख कसा वाटला comments करून नक्की सांगा.

7 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. ������ छान लेख आहे,हे एक कटु सत्य आहे की मोबाईल-इंटरनेट मुळे जग जवळ आलं मात्र माणूस एकमेकांपासून लांब फेकला गेला.

  ReplyDelete
 3. फोटोग्राफी खूप छान आणि लेखही. आपली कला जोपासून ठेवा ती आम्हाला प्रेरणादायी आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks....कला नक्की जोपासली जाईल सर

   Delete