Wednesday, November 20, 2019

कौशल्य.....कला जोपासण्याचे.. skill...to cultivate art

कौशल्य.... कला जोपासण्याचे :
                               
               प्रत्येक जण आपल्या आवडी-निवडी, वेगवेगळ्या कला Art जोपासत असतो. काही त्या कलेत अधिक निपुण असतात, तर काही एक विरंगुडा म्हणून कलेशी जोडलेले असतात. काही जण त्या कलेला कौशल्याशी जोडतात. मागील लेखात आपण आशावादी असण्याचे फायदे जाणून घेतले. तुम्ही आशावादी असाल तर यश तुमच्या जवळच आहे....
art,skill,school,edu,motivation,life,happy,learn,know,photography,training,
   
  तुमच्या अंगी वेगवेगळे कला, कौशल्य असतील तर 'रिकामं मन शैतानच घर' असे कधीच होऊ देणार नाही. काहीच काम नसेल तर आपण कंटाळतो, जावं कुठे? करावं काय? असे मनात प्रश्न उद्भवतात. अशावेळी तुम्हाला कलेची आवड असेल..  जसे... वाचन, लेखन ,गायन ,चित्रकला , रंगकाम , photography , संवाद  अशा अनेक कलांपैकी एक कला ज्याची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही स्वस्थ बसणार नाही. तुमचा कंटाळा, रिकामा वेळ सहज भरून निघेल.
               कला जोपासणे हे ही एक कौशल्य आहे. बहुतेकदा खूप सार्‍या कला अवगत असतांना कामाच्या व्यापामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी कधीतरी तुम्ही तयार केलेली वस्तु दिसली की तुम्ही त्या दिवसांत हरवून जातात. काय तो क्षण, काय ते दिवस असे विचार मनात घर करतात. कधीतर कलेत निपुण असतांना कौशल्यांच्या कमतरतेमुळे आपले कले कडे दुर्लक्ष होते. वेळ आणि अल्पशा मार्गदर्शनाच्या कमीमुळे आपली कला break घेते. अशावेळी दुर्लक्ष न करता थोडासा सराव आणि वेळ द्या. सराव आणी आवडीमुळे कौशल्य आत्मसात होतील.
            बहुतेकदा कलेचे प्रशंसक नसल्यामुळे ही कलेकडे दुर्लक्ष होते. पण प्रशंसक नसणे हा फार मोठा issue नाही. कला ही एक आवड आहे, जी आपल्या अंतर्गत गुणांचा खजिना आहे. जे आपल्याला जमतेय ते इतरांना जमत असेल का? यात ही एक positive पणा ठेवावा. 
        कलेतील कौशल्य अनेकांकडे असतात. फक्त हे कौशल्य वाढीस लावण्यासाठी इतरांपेक्षा वेगळे असावे लागते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शोधक वृत्ती, निरीक्षण कौशल्य, आवश्यक अभ्यासाचा वापर आपल्या कलेत करता येणे अतिशय गरजेचे आहे. तुमच्यातील कलेतील कौशल्य, संकल्पना तुम्हाला उत्कृष्ठपणे मांडता येणे जास्त महत्वाचे असते. कारण केवळ चांगले ज्ञान असून चालणार नाही, त्यासोबत कौशल्यची गरज आहे. परीक्षेत चांगले गुण मिळतात परंतु कौशल्यांचा अभाव असल्याने जीवनात खच्चीकरण होते. 
       म्हणून आनंदासाठी का होईना कौशल्याची जोड द्या. मग पहा.....
                                          एखादी उत्तम लहानशी गोष्ट 
                                          आपण दररोज करत राहिलो,
                                         तर त्या गोष्टीचे कालांतराने 
                                          मिळणारे फळ.....
                                                         महाकाय असते.
art,skill,school,education,motivation,moral,lifestyle,tech,photography,

   बालपणातील किंवा शालेय जीवनातील स्वत: बनवलेले एखाद चित्र, गायलेले गाणं, केलेलं नृत्य, बनवलेली creative वस्तु यांचा शोध घ्या. त्यावस्तू किंवा त्या क्षणाची आठवण जरी केली की तुम्ही बालपणात हरवले म्हणा.
    कला जोपासण्यासाठी ठराविक वयाची मर्यादा नाही. उदाहरण घेतले तर धुळे जिल्ह्यातील मूर्तिकार श्री. राम सुतार [ram v. sutar]  ज्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी जागतिक स्तरावर देशाची मान आणि कीर्तिमान उंचवण्याचे काम केले.  [ statue of unity ] हे त्यांच्या हातून निर्मिती झाले. ज्या वयात शरीराला आराम हवा असतो, अशा वयात ही कलेची आवड अत्यंत कौशल्याने जोपासली, त्या कलेने त्याना मान, सन्मान मिळवून दिला.
        तुमचे वय काहीही असो, कलेची आवड असेल तर जोपासा. थोडसं कौशल्या पणाला लावा, थोडं मेहनत घेऊ शकत तर त्या क्षेत्रात career ही करू शकता. त्यातून कला जोपासलीही जाईल, आनंद ही मिळेल.


लेख कसा वाटला comment करून नक्की सांगा...

12 comments: