Saturday, December 28, 2019

LAUGHTER IS THE BEST MEDICINE. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे.

LAUGHTER IS THE BEST MEDICINE. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे. 
  आजची वाढती धावपळ, कामे , प्रवास, ताणतणाव, अभ्यास, परीक्षा, कुटुंब अशा हजारो कामांत माणूस अडकलाय. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे. हे माहिती असतांनाही जीवनरूपी चक्की पिसण्यातच आपण हास्य विसरुन बसलोय.
     स्मितहास्य smile शब्दातच किती गोडवा आहे. एखाद्याने दिलेले स्मितहास्य किती ऊर्जा देऊन जाते.

एका मराठी दैनिकात वाचायला मिळालेले छान असे वाक्ये...
     निखळ, निर्मळ, हास्य हे मानवाला मिळालेले वरदान आहे. ज्याचे हास्य कुठल्याही प्रसंगात टिकून राहतं, तो योग्य तो निर्णय घेऊ शकतो. म्हणूनच स्थिर आयुष्य जगू शकतो.
happy,smile,laughter is the best medicine,laughter,medicine,laugher is the best medicine,why laughter is the best medicine,is laughter the best medicine,essay on laughter is the best medicine for class 5,essay on laughter is the best medicine for class 4,essay on laughter is the best medicine for class 6,essay on laughter is the best medicine for class 7well,comedy,joyful,photography,motivation,inspiration,moral,art,medicine

           हा  फोटो स्मितहास्य विषयक तुम्हाला inspiring ठरू शकतो.

हसणे म्हणजे फक्त मजा नसते. हसण्यापलीकडे बरच काही असते. जेव्हा तुम्ही मित्रात किंवा कुटुंबात एकत्र येऊन मनसोक्त, मनमुराद हसतात. तेव्हा तुमच्यात संवाद होतो. एकमेकांची जाणीव व सहवास लाभतो. तुम्ही एकमेकांना समजून घेतात. हे हास्य तुमच्या मनाला जोडते .
 आपले मित्र, कुटुंबातील वरिष्ठ व नातलग आपल्याला आनंदी राहण्याचा सल्ला देत असतात. आपणही तितक्याच आत्मियतेने तो सल्ला स्वीकारतो . परंतु जगत मात्र नाही. मित्रहो आनंदी राहण्याचे कितीतरी फायदे आहेत.
       जसे-
 • मन आनंदी राहणे.
 • मन भयमुक्त राहणे. 
 • शरीर रोगमुक्त राहणे . 
 • हृदय तणावमुक्त राहणे. 
 • सहज नवीन मित्र जोडता येणे. 
     मन प्रसन्न राहणे. असे कितीतर फायदे आहेत या हसण्याने, स्मितहास्याने .......पण वाढत्या कामाच्या तणावाने आपण विसरुण बसलोय. हा आनंद पुन्हा मिळवणे सोपे आहे. कसे-

स्मितहास्य जीवनात नेहमी positive राहण्यास प्रोत्साहन देते. समजा तुम्ही office मधील दिवसभराची कामे संपवून घरी परतले आणि घरातील सदस्यांनी एका छानशा स्मितहास्याने तुमचे स्वागत केले की तुमचा दिवसभरचा थकवा, क्षीण क्षणात गायब होईल. कारण या स्मितहास्याने तुम्हाला आपुलकीची जाणीव होत असते.

एखाद्या प्रवासात अनोळखी व्यक्ति स्मितहास्याने शेजारी बसत असेल तर प्रवासातली कितीतरी दडपणे, चिंता ,भीती, कमी होत असते.

laughter,smile,happy,school,photography,art,motivation,inspiration,moral,

हास्य माणसामाणसांना जोडतं ,जेव्हा तुम्ही मनसोक्त हसता तेव्हा एकमेकांत अंतर ठेवणे किंवा सामाजिक श्रेणीची बंदन पाळण असल्या गोष्टी कुठल्या कुठे पळून जातात. लोकशाहीची खरी ऊर्जा म्हणजे हास्य होय.     -जाँन क्लिस [अभिनेता, चित्रपट निर्माता ]
वरील वाक्ये आणि photo मन लावून वाचल्यास हास्य विषयक कितीतरी आठवणी तुमच्या मनात स्मरू लागतील. तुमचं बालपण, बालपणतील मित्र, आणि शालेय जीवनातील कारण नसताना घडलेली आनंदी , निर्मळ हास्य . थोडी आठवण केली की हृदयात उत्साह संचारतो.

      आज फक्त हसण्यासाठी तणाव  दूर करण्यासाठी TV वर कितीतरी LAUGHTER SHOW सुरू आहेत.
The kapil sharma show , चला हवा येऊ द्या .  मोठ्या शहरात हास्य क्लब चालतात. अशा ठिकाणी आपण पैसे देऊन हसत असतो. परंतु तुम्ही कुटुंबात रमा विना पैशाने तुम्ही आनंदी राहणार .
      घरात जर लहान मुलं असतील तर मजाच- मजा. कारण मोकळं, स्वछंद हसण्यासाठी लहान मुलांसारखे मार्गदर्शक नाही. त्यांचे स्वछंद वावरणे , निखळ ,निर्मळ हास्य तुमच्या तणावांवर औषधासारखे काम करतील. जे प्रत्यक्ष औषधांनाही जमणार नाही.म्हणूनच म्हणतात. LAUGHTER IS THE BEST MEDICINE. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे.

चलाआनंदी जीवन जगण्यासाठी कुटुंबात रमुया.....मन आनंदी करूया. 

लेख कसा वाटला हे comment करून नक्की सांगा.  
                                                                 

8 comments:

 1. चला कुटुंबात रमुया.....छान लेखन

  ReplyDelete
 2. सुंदर लेख..👌👍👍🌻बराच मोठा वादविवाद ही एका स्मितहास्य केल्याने संपुष्टात येतो...

  ReplyDelete