Wednesday, December 11, 2019

एकलकोंडेपणा....टाळता येईल. Monotony...can be avoided

एकलकोंडेपणा ...टाळता येईल.
Monotony... can be Avoided .....

मनमिळाऊ माणसे सर्वांनाच आवडतात. मित्रात, कुटुंबात ते हवे-हवेसे वाटतात. परंतु या लाखों लोकांच्या गर्दीतही खूप सारे लोकं एकटे, अलिप्त, एकलकोंडे राहतांना आपण पाहतो . घरात, मित्रात, चारचौघात मिसळून राहायला त्यांना आवडत नाही. तुम्हाला अशाप्रकारे कधी वाटले का ?
monotony,boaring,dull,depression,dreary, motivation,Art,lifestyle,photograpty,moral

        आपल्या परिसरात असे खूप सारे लोकं एकलकोंडे, अलिप्त राहताना जाणवतात. अशा अलिप्त Alone सवयीमुळे जीव धोक्यात आणणे,गमवणे अशा बातम्या नेहमी वाचण्यात येतात. एकलकोंडे व्यक्ति वरील painting प्रमाणे एकटे, boring, dull, alone पडलेले जाणवतात. जगापासून अलिप्त, एकलकोंडे निरुपयोगी आणि रिक्त? असे असल्यास निराश होऊ नका. असे वाचण्यात आले की हा काही घातक रोग नाही.
एकलकोंडेपणा हा एक संकेत आहे... साहचर्य ,जवळीक, आत्मियता याची. जगण्यासाठी जशी जेवणाची गरज. तसेच आनंद मिळवण्यासाठी साहचर्य हवे असते
हा एकलकोंडपणा का निर्माण होतो याची अनेक कारणे असू शकतात. ती सर्व doctor योग्य सांगू शकतात. परंतु कधीकधी एकलकोंडेपणा हा नियंत्रणात नसलेल्या परिस्थितीमुळे ही निर्माण होतो. नविन ठिकाण, नवीन मित्र,. अशात आपल्याकडून समायोजन साधणे जमात नाही. किंवा अजून काही कारणे.....
     हा एकलकोंडेपणा कमी करण्यासाठी माझ्याकडे औषध तर नाही. पण आपणास हिम्मत, inspiration नक्की देऊ शकतो.
मित्रहो.......
एकलकोंडेपणा....टाळता येईल. Monotony...can be avoided  

    Cast Away हा hollywood चित्रपट. वर्ष २०००. मध्ये प्रदर्शित झालेला. आज सहज पाहण्याचा योग आला. चित्रपट पाहता पाहता विचाराना पाझर फुटले. वाटले चला तुम्हालाही सांगूया. वाचून एखाद्या मित्रास आनंद किंवा मार्ग मिळाला तर छानच......या चित्रपतील नायक Hiro एका विमान दुर्घटनेत बेटाजवळ पोहचतो. बेटावर फिरल्यावर कळते बेट निर्मनुष्य आहे.एकटाच आहे म्हणून जीव देण्याच्या भानगडीत पडत नाही . मग सुरू होतो जीवन जगण्याचा संघर्ष. अबोलपणा टाळण्यासाठी झाडे, पक्षी, आणि जवळची वस्तूं बरोबर संवाद करत राहतो. पण जगण्याचा व घरी परतण्याचा संघर्ष जीवंत असल्याने आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतो. शेवटी चार वर्षानी घरी पोहचतो. हा जरी चित्रपट असला तरी त्यातील दृश्य बोलके आहेत. एकलकोंडे पासून सुटकेसाठी हा चित्रपट तुम्हाला प्रेरणा देऊ शकतो. चित्रपट नक्की पहा.
    एकटेपणा हा फक्त अलिप्त राहिल्यामुळेच निर्माण होत नाही. कदाचित काहीच काम नसणे. त्यामुळे काम नाही काय करावे , मन रिकामे ,कोणतेच संघर्ष नाही. रिकामे विचार अति होतात आणि एकटेपणा सुरु होतो. 
Alone,photography,art,motivation,moral,lifestyle,dull,happy,boring

     २.  जंगलात ,पाड्यावर , वस्तीवर कितीतरी लोकांच्या वस्ती असतात. बहुतेक घरं पाडयाच्या लोकवस्ती पासून खूप अंतरावर असतात. टेकडीवर, दर्‍यात एकेकटी घरं वरील photo प्रमाणे. पण या एक- एकट्या घरात राहण्यार्‍या लोकांत कोणतेही एकटेपणाचे आजार होत नाही. कधी-कधी तर दिवसभर / हफ्ते- हफ्ते त्या घरात एकच व्यक्ति राहताना आढळतो. ना  त्यांना एकटेपणाची भीती, ना रडत बसण्याची सवय.
      जंगलात राहणारी लोकं मनाने, हृदयाने कणखर बनलेले असतात. एकटे रहा की सोबतीने जगण्याचा संघर्ष चालूच असतो. सतत छोटी-मोठी कामे आणि संवादासाठी परिसरातील प्राणी ,झाडं आणि बराच काही. एकटाच आहे काय करू म्हणून काही विपरीत [जीव देण्यासारखे ]  केल्याची घटना ऐकण्यात नाही.

     म्हणून मित्रहो आवडी- निवडी तर जपाच पण निसर्गाशीही एकरूप व्हा. निसर्ग तुम्हाला कधीच एकटे असल्याचे जाणवू देणार नाही. 
 वरील दोन उदाहरणे एकलकोंडेपणा कमी करण्यासाठी तुम्हाला नक्की प्रेरणा देऊ शकतील.


एकलकोंडेपणा कमी करण्यासाठी जंगलातच जा. असे नव्हे. समाजात, कुटुंबात, मित्रात मिसळणे अति आवश्यक आहे. वरील दोन उदाहरणे आपणास प्रेरणेसाठी आहेत. वरील उदाहरणातील लोकं जगू शकतात तर आपण का नाही. 

लेख कसा वाटला हे नक्की सांगा. 

10 comments: