Tuesday, December 3, 2019

प्रार्थना...संस्कार घडविते / Pray....makes rites

प्रार्थना... संस्कार घडविते: / Pray.... makes Rites :
     प्रार्थना ही मानवी जीवनातील अनिवार्य आणि अविभाज्य असा घटक बनला आहे. प्रार्थना जणू जीवनशैलीचा एक भाग आहे असे म्हणायला हरकत नाही. ती सर्वत्र आहे  घरात ,शाळेत, बागेत, समूहात, देवळात, एकांतात आणि शुभ-अशुभ अशा प्रत्येक ठिकाणी प्रसंगानुरूप म्हटल्या जातात , ऐकायला मिळतात.
Pray,Rites,mendarory,inseparable,lifestyle,school,edu,photography,moral,art,
मागील लेखात आपण संयमाचे महत्व विषयक वाचले. त्यातून संयमाची क्षमता जाणली. आज आपण प्रार्थना विषयक वाचूया.
 प्रार्थना हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो.
 आनंदात किंवा दु:खात केलेल्या प्रार्थना वेगवेगळ्या असू शकतात. परंतू अर्थ एकच. काही विशिष्ट कार्यसिद्धिसाठी करण्यात येणारी कोणाची तरी स्तुती, यातना किंवा मागणी.
म्हणून प्रार्थना हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जात असल्यामुळे, प्रार्थना म्हणजे नेमके काय ? हे विशिष्ट शब्दात सांगणे कठीण वाटते.
        आपण पाहतो शाळा, कॉलेज मध्ये विध्यार्थांचा परिपाठ प्रार्थनेनेच सुरू होतो. परिपाठातील प्रार्थनेचा अर्थ सरळ आहे,त्यांच्यात चांगुलपणाची सवय निर्माण व्हावी. शिक्षण हे प्रगतीचे माध्यम असल्याने शाळेत प्रार्थना असणे योग्यच आहे. कारण
विशेष म्हणजे प्रार्थनेत प्रचंड ताकत असते. एकाग्रता , संयम वाढवण्यात प्रार्थना मोलाचा वाटा उचलते.
 माझ्या वाचण्यात आले....
हजारो वर्षापूर्वी ऋषि-मुनि, साधू-संतांनी प्रार्थनेची ताकत ओळखली. त्यातून अनेक प्रकारचे मंत्र, स्त्रोत आणि प्रार्थना निर्माण केल्या. या प्रार्थनेतून त्यांना जीवन आधार अनुभवला आणि तो जगलाही दिला.
प्रार्थनेचे महत्व आपण जाणले पाहिजे. वाढत्या स्पर्धेत व्यक्ति किंवा विद्यार्थी सर्वच ताणतणावात असतात. त्यात विद्यार्थी--त्यांना तर अभ्यास, अपेक्षांचे ओझे त्यातल्या-त्यात आदर्श जीवनशैलीच्या अपेक्षेने तर त्यांचे मन सैरभैर झालीत. माझी मुलं इतरांपेक्षा brilliant असावी. ती सर्वच क्षेत्रात चमकावीत. अशी प्रत्येक पालकाची इच्छा. त्यातल्या -त्यात अभ्यासाबरोबर ती सुसंस्कारी ही असावीत. मग संस्कार लागावेत करिता शिस्त लावणे सुरू होते . 

pray,prayer,lifestyle,motivation,moral,edu,last rites,rites,funeral rites,prayer,prayer meet,cleansing rites,vidya, sinha last rites,morning rites,gaelic polytheist rites,comunion rites,prayer meet video,prayer and fasting,rites chapter,chthonic rites,living on a prayer,black mass prayer,vidya sinha prayer meet,fasting and prayer,book of common prayer,forces of hades,rites of investiture,rites of the black mass,rite,st. lukes,exclusive,humanities,praise,theschool,art,photography
लहान मुलं specialy student यांच्या दररोजच्या ताणतणावाला कुठेतरी विराम मिळवा करिता प्रार्थना नक्की मदतीची होईल. कारण शाळा, tutions आणि homework यांचा ताळेबंद ते कसं ठेवत असतील हा ही विचार करायला लावणारा प्रश्न.
 संस्काराचा मूळ पाया म्हणजे "शिस्त". यात प्रत्येक कृतीला शिस्त, नियम घालून घेतले जाणे अति अपेक्षित असते. परंतु बहुतेकदा शिस्तचा मार्ग बदलला किंवा अति शिस्त होऊ लागल्यावर विरोध, बंड ,negetivity निर्माण होऊ शकते.
प्रार्थना मात्र हळवी असल्याने यातून विरोध निर्माण होणे अशक्य आहे. प्रार्थनेला अध्यात्मतेची जोड असल्याने व्यक्ति कृतज्ञता व्यक्त करू लागतो. चांगल्या, प्रामाणिकतेला प्रथम प्राध्यान्य देऊ लागतो.
 स्वत: किंवा आपल्या मुलांत चांगले संस्कार निर्माण व्हावेत करिता आवडतील त्या प्रार्थना नक्की ऐका, ऐकवा. यातून मन समाधानी, शांत, सुसंस्कारी होण्यास मदत होईल.

चांगुलपणा आणि सुसंस्कारी मनाकरिता मी प्रार्थना करतो, आपण प्रार्थना ऐकण्यास, म्हणण्यास सुरुवात करतील.

हा लेख आवडला असेल तर नक्की सांगा , तसेच इतरांना ही वाचण्याठी share करा.

6 comments: