Saturday, January 4, 2020

2020 NEW YEAR RESOLUTION / 2020 संकल्प नवीन वर्षाचे

2020 New Year Resolution / 2020 संकल्प नवीन वर्षाचे: 

वर्ष 2019 पाहता- जगता संपले आणि नेमकेच 2020 वर्षाचा प्रारंभ झाला. मागील वर्षात कितीतरी चांगल्या- वाईट घटना आपल्याबरोबर घडल्यात. त्यात काही फायद्याच्या तर काही शिकवून जाणार्‍या ठरल्या असेलच.
     नव्या वर्षाची चाहूल म्हणा की सुरुवात... वर्ष सुरू होताच नवनवीन संकल्प resolution प्रत्येक जण करत असतो.
संकल्प करण्याचा हेतु सरळ आहे. मागील वर्षातील राहिलेली अपूर्ण कामे किंवा ध्येय, स्वप्नं, लक्ष्य या वर्षात नव्या उत्साहाने, नव्या प्रयत्नाने पूर्ण करण्यासाठी योग्य निश्चय किंवा नियोजन करणे. 
तर पाहूया या नवीन वर्षाचे संकल्प.
2020 New Year Resolution / 2020 संकल्प नवीन वर्षाचे: 


या नव्या वर्षात नवनवे संकल्प केलेच असतील. उदा.......
   सकाळी वेळेवर उठणे,
 व्यायाम करणे, 
वजन कमी करणे, 
अभ्यास करणे,
 कर्च कमी करणे, 
आई- वडिलांशी संवाद साधणे,
 व्यसन सोडणे, 
असे कितीतरी संकल्प आहेत. ज्याची यादी तुमच्या आवडी- निवडी नुसार वाढू शकते किंवा बदलू शकते. परंतु यापेक्षा वेगळा संकल्प तुम्ही कधी करून पहिला का ? जसा मी आज सांगणार आहे. चला पाहूया.

      प्रत्येक जण आपापल्या जीवनशैली नुसार प्रपंच ठरवून जगतात. प्रत्येक जण कामात व्यस्त आहे. नोकरी करणे, व्यवसाय करणे किंवा इतर....हे सततचे काम बहुतेकदा कंटाळवाणे वाटते. या कामातून थोडा आराम मिळावा किंवा 'हवा पाणी बदलणे' असे म्हटले जाते याप्रमाणे , थोडा वेळ काढून स्वत:ला देणे.

resolution,2020,new_year, motivation,inspiration,moral,art,photography,
हा फोटो पाहता हवा पाणी बदलणे याचा अर्थ जाणवला असेलच........
     मला सर्वांनाच प्रश्न होते.........
          आपण कधी स्वत:ला वेळ दिला का?
              स्वत:साठी कधी जगले का?
                कधी लहान होऊन Unseen Life जगावीशी वाटली का? 
असे अवघड प्रश्न एकदा स्वत:ला विचारून पहा? मग संकल्प करा स्वत:साठी जगण्याचा.
  आपले काम, आपले प्रपंच थोडे बाजूला ठेऊन थोडे अलिप्त राहून पहा. मोकळे, स्वच्छंद, बिनधास्त  असे उनाड जीवन निदान एक दिवस जगून पहा. उनाड दिवस शब्द वाचताच अशोक सराफ यांचा 'एक उनाड दिवस' हा मराठी चित्रपट तुम्हाला आठवला असेल. हा चित्रपट एकदा बघाच.....

दररोजच्या कंटाळवाण्या कामाला, नीरस जीवनाला हा एक उनाड दिवस खूप काही शिकवून जातो. आपल्या चाकोरी बाहेरही सुंदर, मजेदार आणि अर्थपूर्ण जीवन असते  जे आपण कधीच अनूभवले नसते, आणि कधी समजूनही घेतले नसल्याने असे जीवन एकदा जगून, समजून बघा. तुम्हाला कितीतरी आनंद देऊन जाईल.

resolution,2020,new,year,motivation,inspiration,moral,art,photography,
 ' जिंदगी ना मिलेगी दुबारा' हा हिन्दी चित्रपट खूप काही शिकवून जातो. फोटो पाहिल्यावर या चित्रपटाचे poster आठवले असेलच.
              आपण थोडा विरंगुळा, थोडा बदल म्हणून कौटुंबिक एखादी छोटीशी सहल किंवा long tour काढत असतो. सहल आनंद , मजेसाठी असते. पण कौटुंबिक सहली किती आनंद देतात, हे प्रत्येकाला माहिती आहेतच. सहलीपेक्षा स्वत:ला वेळ देण्यासाठी हा उनाड दिवस मला Effective वाटतो.
     अनोळखी ठिकाण ,अनोळखी मित्र , आपण कधीच न जगलेले असे Unseen Life जे कोणाचीही पर्वा न करता जगलेले क्षण, स्वत:ची Prestige बाजूला ठेऊन, एखाद्या लहान मुलांप्रमाणे जगून पहा. तुम्हाला आनंदच आनंद देऊन जाईल.
संकल्प म्हणून आपण नेहमी मोठे Target ठरवत असतो. हे Target पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत असतो. लक्ष्य पूर्ण करण्याच्या चक्करमध्ये स्वत:साठी जगणेच राहून जाते. अशावेळी हा माझा वेगळा संकल्प तुम्हाला आवडू शकतो. कारण हा वेगळा संकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष उठाठेव करण्याची गरज नाही.
                वरील दोन्ही फोटो लहान मुलांचे आहेत. यावरुन तुम्ही समजू शकता बिनधास्त जगण्यात मुले नेहमी प्रभावी असतात. लहान मुलांना कधीच चुकल्याच वाटत नसते. कोणाचीही पर्वा न करता आवडेल तसे जीवन जगतात. म्हणून ते नेहमी आनंदी, बिनधास्त असतात.

2020 चा संकल्प माझा नवा. चला बिनधास्त जगूया, एक उनाड दिवस जगूनच पाहूया.


लेख कसं वाटला हे comment करून नक्की सांगा.

   


6 comments:

  1. खरच खुप छान लेखन. . .पाहता पाहता . .तु खुप मोठा झालास. . .!

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks dada...पण छोटासा प्रयत्न आहे हा...

      Delete