Tuesday, January 21, 2020

Memories ....lets keep आठवणी... चला जपूया.

Memories...lets keep   आठवणी... चला जपूया 

आठवणी म्हटले की प्रत्येक जण स्तब्ध होतो, आपआपल्या जीवनात घडलेल्या घटना आठवण्यात मग्न होतो. या आठवणी असतात तरी कशा, या  आठवणी इतक्या का महत्वाच्या असतात. तर.....आठवणी म्हणजे भूतकाळाला उजाळा देणे.मग भूतकाळ आनंदी असो की वेदनादायक... वर्तमानात हाच भूतकाळ आठवणीरुपी प्रोत्साहन देत असतो.
म्हणतात....

आठवणी पासून पाठ फिरवू नये.कारण माणूस आठवणीवरच अधिक जगतो. आठवणी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. परंतु प्रोत्साहन मात्र आठवणीच देतात .

memories,art,photography,childhood,motivation,lifestyle,inspiration,moral
वरील pencil skach पाहता तुमच्याही आठवणी जागृत झाल्या असतीलच. 
म्हणतात आठवणी जपल्या पाहिजेत, आठवणी जपणे का चांगले किंवा फायद्याचे असते. 
चला पाहूया. 
Memories... lets keep    चला आठवणी जपूया
                आठवणींच्या सर्व प्रकारात बालपणाची आठवणी मात्र भलत्याच मजेदार असतात. तसं प्रत्येकाचं बालपण आपापल्या त्या काळातील परिस्थिती नुसार असू शकते. शहरातील असो की एखाद्या छोट्याशा खेडेगावातलं  बालपण ते बालपण  मग ते आनंदी असू शकते किंवा धावपळीचं. पण आनंदात मात्र गेल असेलच.           
               बालपण म्हटले की कितीतरी निरर्थक वस्तूचा सदुपयोग अती हुशारीने करणे. यात शहरी भागांतील बालपण अपवाद असू शकते. कारण शहरी भागात बालपणात मुलांना खुप सारे वस्तू आयत्या दुकानातून असतात. परंतु एखाद्या छोट्या खेडेगाव म्हटले की सर्व वस्तू ज्या रिकाम्या म्हणून असतांनाही त्यांचा खेळ म्हणून अति हुशारीने वापर होत असे. 

१९८० ते १९९५ या काळातील बालपण हे अति हुशार  म्हणावेसे वाटते. त्या काळात मुलांना खास करून गावात खेळण्यासाठी खेळणं पालकांकडून (काही अपवाद वगळता) सहजासहजी उपलब्ध करून देण्याचे लाड पुरवले जात नसे. त्यामुळे मुलं घरात, परिसरात उपलब्ध वस्तू खेळणं म्हणून वापरत असे. त्या वस्तूंची स्थिती योग्य नसतांनाही मोठ्या चलाखीने त्यांचा वापर होत असे. जसे.... माठावरील झाकण,सायकलचे चाक, दगड,विटा,तार, स्वयंपाक, घरातील वस्तू आणि असे बरेच काही...
          हे बालपण तुम्ही आज कोणत्याही वयाचे असोत थोडं आठवलं की क्षणात मनात आनंद संचारतो. तुम्ही कोणत्याही कामाच्या व्यापात असा, हे बालपण आठवले की मन उत्साही होते. तूमचे मन कामाच्या व्यापाने ग्रासलेले असेल तर मन हलके  व प्रोत्साहीत करण्यासाठी आठवणी त्याही बालपणाच्या कितीतरी आनंद व प्रोत्साहन देऊन जातील.
       तुम्ही खेळलेले खेळ विटी दांडू पासून लपाछपी, काट्यात हुडकून काढलेले बोरं, गाभुळलेले चिंच , जत्रेतील पत्र्याची शिट्टी, चटक्याच्या बिया, सर्कस मधला जोकर, असे कितीतरी मजेदार खेळ तुम्ही आम्ही खेळलेले, अनुभवले असावेत. ज्या वस्तूंना कोणतीही किंमत नव्हती,पण आनंद आणि प्रेम भरभरून देऊन गेले. असे खेळ आज जर आठवले की मन भरून येईल. ह्या आठवणी करताच  तुमच्या  धावपळी, कामाचा ताण दूर सारून  तुम्हाला पुन्हा लहान व्हावेसे वाटेल.  कदाचित यासाठीच  म्हणत असावेत बालपण देगा देवा
         जीवनातल्या  सर्व प्रकारच्या आठवणीत बालपणाची आठवणी मला अधिक सुखद वाटते. एकदा बालपणाच्या आठवणीत हलवण्यास काही हरकत नाही.....

            आठवणी वर आधारित कितीतरी कविता,गाणी आपण ऐकतो आणि ऐकता- ऐकता आपण आपल्याच आठवणीत हरवतो. 


"आठवणी जपूया, वाटेल तेव्हा त्या गोंजारूया. आठवणी कडू असतील तर समजून घेऊया, अन् गोड असतील तर मनसोक्त हसूया. आठवणी जपूया मनाच्या कोपऱ्यात, ह्रुदयाच्या स्पंदनात.

चला जीवन आनंदी आणि सुखद करण्यासाठी पुन्हा एकदा भूतकाळात डोकाऊया. चला आठवणी जपूया. 

लेख कसा वाटला comment करून नक्की सांगा.
 
                     


8 comments: