Tuesday, February 18, 2020

Benefits of inspiration? प्रेरणेची फायदे ?

Benefits of inspiration? प्रेरणेची फायदे?

      जीवनात यशस्वी होण्यासाठी कुणाकडूनही मिळालेली प्रेरणा महत्वाचे काम करत असते. व्यक्ति कोणत्याही कामात, स्पर्धेत किंवा जीवनात यशस्वी झाल्यावर आपण जाणीव पूर्वक त्याच्या प्रेरणास्थाना विषयी विचारतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रेरणा [ inspiration, motivation ] ही महत्वाची भूमिका बजावत असते. कुटुंबात प्रेरणास्थान म्हणून आईला मान देणारे आपण खूप पाहिले, ऐकले असेलच.

अच्छी किताबे और अच्छे लोग, तुरंत समजमे नही आते. उन्हे पढना पडता है |

                    वरील प्रकारची वाक्ये आपल्याला नेहमी  वाचायला मिळतात. अशी प्रेरणादायी वाक्ये आपल्याला मार्गदर्शक ठरतात.
     आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त आहे. व्यवसाय चांगला चालावा, परीक्षेत चांगले गुण मिळावेत, कुटुंब सुखी राहावे, मला यश मिळावे करिता झटत असतात. अशावेळी एखाद्याने मार्गदर्शन केले की आपल्याला मोठी प्रेरणा मिळते. परंतु भेटलेली प्रत्येक व्यक्ति आपल्याला मार्गदर्शन, प्रेरणा देईलच असे नाही. कामात सातत्य आणि यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला आज कुटुंब, मित्र किंवा वरिष्ठांकडून प्रेरणा, प्रोत्साहन, मार्गदर्शन, आधार मिळणे गरजेचे झाले आहे.
Benefits of inspiration:-
     प्रेरणेचे खूप सारे फायदे आहेत. जसे-
                      # प्रेरणेमुळे आपल्याला स्फूर्ति मिळते.
                      # प्रेरणेमुळे आधार मिळतो. 
                      # प्रेरणेतून चालना मिळते. 
                      # कृती /क्रिया करण्यास बळ मिळते. 
                      # प्रेरणेतून मानसिक आरोग्य सुधारते. असे कितीतरी फायदे प्रेरणेतून आपल्याला मिळतात.
The value of inspiration:-
प्रेरणा कुठे?, कोणाकडून?, केव्हा मिळेल?  यासाठी विशिष्ट व्यक्ति, वेळ किंवा जागा असण्याची गरज नाही. जीवन प्रवासात भेटलेला प्रत्येक व्यक्ति,प्रत्येक वेळ, जागा आपल्याला प्रेरणा देऊन जात असतात.
inspiration,motivation,inspireus,moral,culture,art,lifestyle,photography,article
              वरील फोटो आपणास प्रेरणादायी ठरू शकतो. कारण कलाप्रेमीने आपली कला आणि संस्कृती दोन्ही जोपासल्या आहेत. ते ही एका शेतीच्या बांधावर. ही concept प्रेरणा घेण्यासारखी आहे.

आज प्रेरणा, प्रोत्साहन मिळणे प्रत्येकाची गरज होऊन बसलीय. प्रत्येक ठिकाणी क्षणोक्षणोची स्पर्धा आणि त्यात यशस्वी होणे तारेवरची कसरत झाली आहे. परंतु ही प्रेरणा फक्त जिंकणे किंवा यश मिळवण्यासाठीच फायद्याची असते का? 
 तुम्ही एखाद्या आजाराने ग्रासलेले असतांना त्या आजाराला  सामोरे जाण्यासाठी, त्या आजाराला प्रतिकार करण्यासाठीही तुम्हाला प्रेरणेची गरज आहे.  आजार म्हटले की सहानुभूती येतेच. तशी प्रत्येक रोगीला त्याची गरज आहे. 
            आज मी आपल्यास आजारात सहानुभूती बरोबरच आजाराला प्रतिकार करण्याची हिम्मत देणार आहे. कदाचित तुम्हाला आजाराला दोनहात करण्याचे बळ व प्रेरणा देऊन जाईल. 
     प्रत्येक आजारी व्यक्ति कुठेही गेले असता बसणे, चालणे किवा हालचालीस नकार देतो. अशावेळी समोरील व्यक्ति आपुलकीने विचारतो . त्याना आजारानुसार व्यवस्था व मदत करतो, सहानुभूती देतो. परंतु ही सहानुभूती व व्यवस्था जितकी गरजेची तितकीच त्या रोगीला हतबल करणारी असते. असा माझा अनुभव आहे. कारण दुखणे तर आहेच,परंतु अति सहानुभूती व व्यवस्थेमुळे व्यक्ति निष्क्रिय होतो.  मी आजारी आहे, मला त्रास होतो हे वारंवार ऐकल्यामुळे त्याची तशी मनोवृत्ती तयार होऊन जाते. अशावेळी आजार बरा होणे ऐवजी वाढत जातो. वाढलेला आजार मग आपल्या शरीराला control करतो. अशावेळी आजार सांगेल तशी आपली दिनचर्या सुरू होते. 
           सहानुभूतीची आवश्यकता आहेच, पण ती अती होऊ न देता आजाराला प्रतिकार करणे व आजारालाच control मध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे. आजार आपल्यावर अधिकार गाजवण्यापेक्षा, आपणच आजारावर अधिकार गाजवावा. वारंवार आजाराची आठवण करत चिंतेत राहण्यापेक्षा मी आजाराला बरा करू शकतो याची मनात हिम्मत असुदया. आजाराला हसत सामोरे जा. मनात नेहमी positive thinking ठेवा. ही thinking औषधासारखी काम करेल. तुम्ही औषधापेक्षा मानसिक हिमतीनेच बरे होऊन जाणार. 
         प्रेरणा तर दिव्यांग व्यक्तिकडून अचूक घेता येईल. दिव्यांग बांधव कधीच आजारचे रडगाणे इतरांना ऐकवत बसत नाही. दिव्यांग असतांनाही त्यांच्या जगण्यात कमालीची ऊर्जा असते. कुठेही सहजसहजी हार मानत नाही. त्यांचे जगण्याचे कौशल्य इतरांना प्रेरणादायी आहे.
 Benefits of inspiration? प्रेरणेची फायदे ..... आपल्यास आवडले तर इतरांना नक्की सांगा. कदाचित एखाद्या बांधवाला प्रेरणा मिळून जाईल. 

                         लेख कसा वाटला comment करून नक्की सांगा.
7 comments: