Friday, October 23, 2020

Online Search कितपत फायदेशीर ठरू शकते ?

 Online Search कितपत फायदेशीर ठरू शकते ?

 

Online Search करणे हा नवा Trends समाजात रूढ होताना दिसतोय किंवा झालेला आहे.  आज कोणत्याही अर्थपूर्ण किंवा निरर्थक गोष्टीची माहिती घ्यायची म्हटलं तर कोणीही सहज "Google", "YouTube" वरती Online Search करताना आपण पाहतो.

Online Search करण्यामध्ये सगळ्यात जास्त 

Open Source software चा वापर केला जातो.  Google, YouTube आणि इतर.

 

गरज ही शोधाची जननी आहे. हे आपण ऐकले, अनुभवले आणि शिकलो आहे.  Online search करताना शोधण्याची कोणतीही Limitations नसतात. Search काय करावं आणि काय करु नये हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो.

बहुतेकदा निरर्थक व अडचणी आणणारा गोष्टीचा Search केला तर त्याचं नुकसान ही बहुतेक लोकांना भोगावे लागले आहेत. अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळालेल्या असतील.

Search करण्याला काही बंधने असावीत, तशी गरज समाज सुरक्षा म्हणून ती प्र शासनाने लावली. हे खरंच आवश्यक आणि गरजेचे होते. आणि ते आहे सुद्धा

Internet चा आपल्यासारखंच मी ही चाहता. सर्वां प्रमाणे मी ही Google, YouTube  वरती माहिती  Search करत असतो. Search करण्याचे बंधन लक्षात ठेवून मी ही वेगवेगळ्या शैक्षणिक आणि समाजिक विषयावर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.

 Search करण्याची बंधनं पाळले त्यामुळे नुकसानास आज सुद्धा मी पात्र ठरलेलो नाही, याचा आनंद आहे.


 


             Google, YouTube प्रमाणे Quora हे एक छान Search माध्यम आहे. Quora सुरुवातीला मला फक्त प्रश्नोत्तरांचा ठिकाण आहे असं वाटत होतं. परंतु हळूहळू त्यावर वेगवेगळ्या प्रश्नांची दर्जेदार उत्तरे ती ही मुद्देसूद वाचायला मिळू लागली. त्यामुळे मी खूप प्रभावित झालो. वेगवेगळ्या विषयावरील वेगवेगळे प्रश्न एकाच ठिकाणी, एकाच मंचावर उपलब्ध होत असतात. समाजात किती नामवंत आणि हुशार व्यक्ती आहेत जे आपल्या विचारांच्या पलीकडे प्रश्न विचारू शकतात आणि त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तितकीच मुद्देसूद आणि विचार करायला लावणारी त्याचबरोबर त्या उत्तरांना संदर्भासह असणारे उत्तरे वाचायला मिळणे हा एक प्रकारचा विलक्षण लाभ.

Quora वर असाच एक छानसा प्रश्न आणि त्याला मिळालेलं उत्तर मला वाचायला मिळालं. प्रश्न आणि उत्तर माझ्या ब्लॉग ला म्हणजेच www.inspireus.in साठी लाभदायक वाटला‌. 

प्रश्न होता….

🐜 मुंगीचे तत्वज्ञान (Ant philosophy) म्हणजे काय

या प्रश्नाला कमलाकर विजय ठाकरे यांनी संदर्भ देऊन उत्तर दिलं होतं. संदर्भ होता "जीम रोन" (Jim Rohn) यांच्या निरीक्षणाचा. 

जीम रोन यांनी मुंगी च्या तत्वज्ञानावर आधारित चार तत्त्वे त्यांच्या लेखनामध्ये लिहिली होती. 

मुंगी च्या तत्त्वज्ञानाविषयी मी काही निरीक्षण केलेले नाही. परंतु मला कमलाकर विजय ठाकरे यांच्या लेखणी तून आणि जीन रोन यांच्या निरीक्षण संदर्भातून मला वाचायला मिळाले. 

 

मुंगीचे तत्वज्ञान-

मुंग्या कधीही हार मानत नाही.

मुंग्या चालू असलेल्या उन्हाळ्यातही भविष्यात येणाऱ्या हिवाळ्याच्या विचार करतात.

मुंग्या चालू असलेल्या हिवाळ्यातही उन्हाळ्याची विचार करतात.

मुंग्या नेहमी "जेवढे शक्य आहे, तेवढे घेण्याचा" विचार करतात.

 

ही चार तत्वे आणि त्यांचं विश्लेषण वाचल्यानंतर मी खूप प्रभावित झालो आणि आपणही प्रभावित होणार.

मुंग्यांप्रमाणे जगणं याविषयी आपण खूप सारे लेख, पुस्तके, कविता वाचलेल्या आहेत. 

   पुस्तकातून, कवितेतून आणि लेखांमधून आपल्याला मुंग्यांकडून नेहमी एक गोष्ट घेण्यासारखी असते. ती म्हणजे प्रेरणा(inspiration), प्रोत्साहन(Motivation). लहान मुलांच्या पुस्तकांपासून तर मोठ्यांपर्यंत आपल्या मुंग्यांविषयी आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेरणे विषयी वाचायला मिळते. परंतु मुंग्यांचे तत्वज्ञान असू शकते हे मात्र Jim Rohn यांनी विशेष वेळ देऊन केलेल्या निरीक्षणातून समजत. मुंग्याही त्यांच्या तत्त्वानुसार वागत असतील हे थोडं पहिल्यांदाच वाचायला मिळालं.  या नविन माहिती मिळण्याचं श्रेय मी Google,Quora या माध्यमांना देईन.

   वरील चार तत्वे ही मुंग्या च्या जीवनशैलीशी निगडित आहेत. मुंग्या त्यानुसार दैनंदिन जीवन जगतात.

वरील तत्वाप्रमाणे आपण ही दैनंदिन जीवन जगू शकतो का?

मुंग्यांच्या तत्त्वाचा वापर मनुष्याच्या दैनंदिन जीवनात करता येईल का?

असे प्रश्न सहज मनात येतात....

       थोडक्यात काय तर मुंग्यांच्या तत्त्वापासून आपणही प्रेरणा घेऊन आपले दैनंदिन जीवन आनंदी आणि विश्वासनीय करू शकतो असं वाटतं.

ज्याप्रमाणे मुंग्या त्यांच्या तत्त्वानुसार कधीही हार मानत नाही. हे आपण वाचले त्याप्रमाणे आपणही आपल्या निवडलेल्या कामात जोपर्यंत यश मिळत नाही. तोपर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजे. मुंग्या ज्याप्रमाणे सतत शोधत असतात, कधीही हार न मानता, मग ते कामाचे किंवा खायचे. ते सापडल्या नंतर त्याचा इतरांना ही माहिती देतात. म्हणजे सतत नवीन काहीतरी शोधणे. सापडल्यावर इतरांनाही सांगणे. नंतर त्याचा वापर सर्व मिळून करणे. यातून सुरक्षितता, एकोपा, सहानुभूती यासारखे मूल्य आपल्याला सहज आपल्या समाजात रुजवता येतील  किंवा स्वतःमध्ये रुजवता येतिल.


 

      मुंग्या सध्या चालू असलेल्या उन्हाळ्यात भविष्यात येणाऱ्या हिवाळ्याचा ही विचार करत असतात. या तत्त्वानुसार आपणही भविष्याविषयी जागरुक असले पाहिजे. आज आपल्याकडे भरपूर पैसा किंवा सुख समाधानाच्या वस्तू असतील.  त्या कधीच संपणार नाही असं समजणे चुकीचे आहे. मुंग्यांप्रमाणे आपणही भविष्याविषयी जागरुक असले पाहिजे आणि त्यानुसार सतत कामात गुंतलेला असावे.

 मुंग्या नेहमी साठवण करत असतात जेणेकरून येणाऱ्या नवीन ऋतूत त्याचा वापर व्हावा.  त्यानुसार आपण अधिक खर्च,वायफळ खर्च यावर बंधने आणली पाहिजे. साठवण आणि योग्य वापर याचा ताळमेळ जमवता आला पाहिजे. मुंग्या प्रमाणे आपणही साठवणीची कला शिकलो तर भविष्यात आपल्याला ही कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

 

Search करण्याची माध्यम भरपूर आहेत. चांगलं किंवा वाईट, काय search करावे? हे तुमच्या स्वतःवर अवलंबून असते. 

 काय घ्यावे? आणि काय घेऊ नयेहे ज्याप्रमाणे आपण मुंग्यांकडून शिकू शकतो. त्याचप्रमाणे online search काय करायचं? आणि काय करू नये? हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. चुकीचं शोध घेतल्यानंतर किंवा चुकीचा search केल्यानंतर त्याचे नुकसान काय होतात हे आपण सर्वजण अनुभवतोय. म्हणून open search software मध्ये Google, YouTube, Quora आणि इतर माध्यम आहेत. ही किती प्रभावी ठरू शकतात हे तुम्ही समजू शकता. जर त्याचा दुरुपयोग करायचं, तसा विचार तुम्हाला झाला, तर तुम्ही करू शकता. आणि त्याचं नुकसान तुम्हाला भोगावे लागेल. परंतु त्याचा फायदा कसा घ्यायचा हे जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही या open search engine किंवा इतर social media चा तुम्ही खूप साऱ्या चांगल्या गोष्टी सर्च करू शकता‌ आणि त्याचा उपयोग तुम्ही स्वतःच्या जीवनात करू शकतात. म्हणून मला या सगळ्या गोष्टी प्रेरणादायी वाटतात.

या लेख च्या माध्यमातून मी आपणास online search करा असे आवाहन करत नाही. हा आपल्या सर्वांचा वैयक्तिक प्रश्न आहे. 

            चांगल्या माहितीचा संग्रहासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या सर्च इंजिनचा वापर करून चांगल्या व गरजेच्या विषयावर ऑनलाईन माहिती मिळवू शकता. चांगली माहिती search केल्यानंतर त्याचा सदुपयोग केला तर आपल्या कितीतरी अडचणी घरी बसल्या-बसल्या मिटू शकतात . याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेक मित्राने घेतला असेलच.

 

हा लेख आवडला असेल तर इतरांना नक्की share करा.

 


10 comments: