Monday, November 2, 2020

How to inspire small things. लहान-सहान गोष्टीतून प्रेरणा कशी घ्यावी.

 

How to inspire small things.

लहान- सहान गोष्टीतून प्रेरणा कशी घ्यावी.

 

          स्पर्धा सर्वच विभागात पाहायला मिळतात. असा एक ही विभाग नाही की  तुम्हाला स्पर्धक भेटणार नाही. स्पर्धेत तोच अव्वल ठरतो जो इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करतो. त्याचं काम इतरांपेक्षा प्रभावी दिसतं. कामातील वेगळेपण हे त्याच्या कौशल्यावर अवलंबून असते. कामातील वेगळेपण, विशेष कौशल्य हे त्याच्या कामातील प्रामाणिकपणा, मेहनत आणि मिळालेल्या प्रेरणेने शक्य असते.

    निवडलेल्या कामामध्ये यश मिळावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागेल. कामातील सातत्य टिकून राहण्यासाठी तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहनाची नितांत गरज असते.

       जगात आपल्या व्यवसायात किंवा शाखेत उस्फुर्त असे यश मिळविणाऱ्या व्यक्तींची नावे आपणास माहिती आहेत. यशस्वी लोकांची यादी करण्याचे म्हटल्यास जसजशी कामाची व्याख्या बदलेल तसतशी यशस्वी लोकांचीही यादी वाढतच जाईल.

Technology हा विषय आज सर्वांचा आवडता झाला आहे. Technology फक्त एक विषय नसून तो एक व्यावसायिक दृष्टीकोन झाला आहे.

 Technology हा विषय निवडला तर या विषय आणि विषयाशी संबंधित व्यवसायात यश मिळविणाऱ्या व्यक्तींची यादी Google वर search करून पाहिली तर जगात Top-10 यशस्वी व्यक्ती कोण आहेत हे तुम्ही पाहू शकता. Jeff bezos , Bill gates, Larry Ellison, Mark Zuckerberg, Steve jobs, Larry Page….. अशी नावे वाचायला मिळतील.

What can inspire a person:-

      या यादीतील आपल्या नेहमीच्या परिचयाची नावे कोणती? का? असा प्रश्न विचारला तर आपसूक होऊन आपण त्यांची नावे Bill gates, Steve jobs, Mark Zuckerberg….. अशी सांगू. जगातील यशस्वी top 10 व्यक्ती मधून आपल्या भारतात या तीन व्यक्तींविषयी जास्त search केले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. Microsoft, Apple mobile आणि Facebook  यांचा जगाप्रमाणे भारतातील वाढता वापर. Top 10 मधील इतर व्यक्ती आणि त्यांच्या कंपनी ही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

 

How to inspire small things.

    वरील परिच्छेद मध्ये जगातील technology मधील यशस्वी झालेल्या नामवंत व्यक्तींची यादी सांगितली. या यादीतील लोकांनी टेक्नॉलॉजीमध्ये जगात स्वतःचं स्वतंत्र असे स्थान निर्माण केले आहे. जगात स्वतःला अव्वल नेण्यासाठी या व्यक्तीने अतोनात मेहनत केली असेल, हे त्यांच्या प्रसिद्धीवरूनच कळते. प्रश्न असा निर्माण होतो की या यशस्वी व्यक्तीने हे यश कसे मिळविले असेल? यासाठी यांनी कोणकोणत्या मेहनती केलेल्या असाव्यात?  या प्रश्नाच्या उत्तरांसाठी प्रत्येक जण या प्रसिद्ध व्यक्तींच्या success story ऐकतात किंवा वाचतात. success story वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्याची स्वप्ने पाहतो आणि रंगवतो.

Thing that inspire me at work:-

"यश मिळवण्यासाठी मेहनत आवश्यक असते. मेहनतीला जोड असावी लागते ती अचूक मार्गदर्शनाची.मार्गदर्शनात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रेरणा-प्रोत्साहन."

 

    तुम्ही निवडलेल्या कामात मेहनत,मार्गदर्शनाबरोबरच यशस्वी व्यक्तीकडून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले, की यश तुमच्या पदरात असते,असे आपण ऐकत आलो आहे. 

     प्रत्येक वेळी जगातील यशस्वी व्यक्तींच्या success story ऐकल्या किंवा वाचल्या नंतर तुम्हाला यश मिळेलच असे नाही. कारण वाचायला मिळालेल्या यशस्वी लोकांच्या success story अचूक असतील? हाही प्रश्न आहे. यशस्वी लोकांच्या success story त्यांच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने प्रसिद्धी करून इतरांना अडचणीत आणण्याचे प्रकरणही आपण ऐकले असतील. कितीतरी यशस्वी लोकांनी यश मिळाल्यानंतर स्वतःच्या आत्मकथा पुस्तक-रुपी प्रसारित केल्या. भरमसाठ विक्री आणि प्रसिद्धीसाठी त्यात न घडलेल्या घटनांचा ही त्यांनी उल्लेख केला. असे बहुतेकांना वाचण्यात आल्याचे अनुभव कथन आपणास ऐकायला मिळाले असेल.

     मुद्दा येतो तो यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेण्याचा... जगभरातील यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेत असताना प्रत्येकला वाटून येते,की यशस्वी व्यक्तींनी काहीतरी वेगळी मेहनत घेतली असावी. म्हणून ते त्यांच्या कामात यशस्वी झाली असावीत.  कधीकधी सर्वसाधारण व्यक्ती विचार करतो, जगातील नामवंत व यशस्वी व्यक्तींची बरोबरी करण्याचे धाडस आपण का करावे? त्यांच्यापर्यंत पोहोचणे अशक्यच! असा निराशावादी विचार मनात आणून पळवाटा निर्माण करतो…

जसे...

 • त्यांना यश संपादनासाठी तेथील वातावरण पूरक असावं.
 • त्यांची घरची परिस्थिती चांगली असेल.
 •  त्यांना शिक्षक आणि मार्गदर्शक चांगले मिळाले असतील.
 •  त्यांना गरजेच्या वस्तू वेळेवर आणि चांगल्या दर्जाचे मिळाल्या असाव्यात.

 म्हणून त्यांना यश मिळालं असावं…..

             असे एक ना हजार कारणे पुढे करून आपण मेहनतीला विराम देण्याच्या पळवाटा पुढे आणतो. मेहनत बंद, काम बंद यश मिळविणे एक अंधश्रद्धा आहे.असे ब्रीद मनात ठासून घेतो.

जगातील प्रसिद्ध व्यक्तींची बरोबरी करणे अशक्य असू शकते? परंतु त्यांचा मार्ग निवडणे हे चुकीचे असू शकत नाही. तुम्हाला कोण म्हणते की दुसरे Microsoft, दुसरे Facebook, दुसऱ्या Apple phone ची निर्मिती करा. या technology चे ownership तर त्यांच्या नावावर आहे ज्यांनी त्यांची निर्मिती केली.

      आजचा तरुण यश मिळविण्यासाठी धडपडतोय. त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतोय. तो प्रसिद्ध व्यक्तींची success story वाचतोय. महागडे counselling classes करतोय. परंतु मार्गदर्शन लाभल्यानंतर ही आपल्या कामात यशस्वी होत नाही. शेवटी हतबल होतो आणि विघातक सवयीच्या आहारी जातो. 

    यश मिळवण्यासाठी जगप्रसिद्ध व्यक्तींच्या success story वाचून, नुसतेच यशस्वी होण्याची स्वप्न पाहात बसण्यापेक्षा, आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील (गाव, तालुका, जिल्हा ) एक तरी व्यक्ती असेल, ज्याने इतरांपेक्षा वेगळे काम केलेले असेल, आणि आज यशस्वी जीवन जगत असेल. अशा व्यक्तीकडून घेतलेली प्रेरणा ही जगातील नामवंत व्यक्तीच्या success story वाचून मिळालेल्या प्रेरणेपेक्षा दमदार असू शकते. असे माझे वैयक्तिक मत व अनुभव आहे.

   अशीच एक माझ्याच परिसरातील successful story मी आपणास सांगतोय. ज्या व्यक्तीने global level वर तंत्रज्ञानाशी संबंधित(mobile,apps photography) स्पर्धेत स्वतःला सिद्ध करून दाखवलं. त्या व्यक्तीकडून मीही प्रेरणा घेतली आणि यशस्वी झालो.

   2011 ते 2016 या कालावधीत Nokia ही Top वरची mobile company होती. Nokia ची Lumia series ची quality product म्हणून जगभरातच चलती होती. Nokia कडून Lumia series च्या माध्यमातून apps,photography,videography वर आधारित वेगवेगळ्या global level वर contest आयोजित करत असे. ज्यात प्रथम विजेत्याला new launch झालेले Lumia mobile बक्षीस म्हणून 

London हून आपल्या पत्त्यावर घरपोच पाठवली जात असे. 

i'm inspired by you:-

       अशा स्पर्धेत माझ्या मित्रांने (shiva kaluse) दोनदा यश मिळविले. जानेवारी 2014 मधील #MyResolution ही पहिलीच स्पर्धा जिंकली. या स्पर्धेचं पहिलं बक्षीस #Lumia1020 हा mobile phone होता. एक महागडा Mobile phone जिंकून तो प्रत्यक्ष वापरण्याचा योग आणि आनंद त्याला लाभला. त्यानंतर #Colorpop ही दुसरी स्पर्धा त्याने जिंकली. या दोन स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांनी माझ्यातली Art ची आवड लक्षात घेऊन मार्च 2014 मधील #LumiaLandscape या स्पर्धेत सहभाग घेण्याचा मला आग्रह केला. जागतिक स्तरावरील स्पर्धेत आपण कसं काय टिकणार? म्हणून मी सहभाग टाळण्याचा पळवाटा काढत होतो. पहिले दोन दिवस थोडा प्रयत्न करून मी काम बंद केले. पुढच्याच दिवशी मात्र मित्राने स्पर्धेत सहभाग आणि यश मिळण्याचे सूत्र समजले.

यश मिळवण्यासाठी….

   "कामाची अचुक निवड, आवश्यक मेहनत, कामात सातत्य, कामाप्रती प्रामाणिकपणा, सकारात्मक दृष्टिकोण आणि कामाला पूर्ण वेळ देणे... याची अचूक सांगड घातली की यश तुमच्या पासून दूर जाणार नाही"

 

काम निवडल्यानंतर त्या कामाच्या मागे इतकं लागावं कि...जसे शिकार करणारे प्राणी आपली शिकार पूर्ण आपल्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत त्याचा पाठलाग करतात.

 What inspires you:-

     मित्राचं अचूक मार्गदर्शन व त्यांनी मिळविलेल्या यशाच्या प्रेरणेने मी त्या स्पर्धेला पूर्णवेळ दिला, सर्व मेहनत दिली. आणि मार्च 2014 ची #Lumialandscape ही स्पर्धा जिंकली. जागतिक पातळीवरील पहिलं बक्षीस #Lumia1320 हा mobile phone बक्षीस म्हणून मिळाला. त्यानंतर मित्राने सांगितलेल्या यश मिळवण्याच्या सूत्राचा पुन्हा अचूक वापर करून #AchieveMore ही दुसरी स्पर्धा जिंकली. #Lumia830 हा mobile phone बक्षीस म्हणून मिळाला.

     या सर्व स्पर्धा जागतिक स्तरावरील होत्या. जागतिक स्तरावरील स्पर्धेचे महत्व तुम्ही समजू शकता. स्पर्धा Mobile,apps, photography वर आधारित होत्या. मिळालेली बक्षिसे आणि त्यांच्या किमती आपल्याला न परवडणाऱ्या होत्या. परंतु मेहनत मार्गदर्शन आणि प्रेरणेच्या जोरावर हे सर्व शक्य झालं.

    वरील सांगितलेल्या परिसरातील success story मध्ये कोणती बक्षिसे मिळवली, कोणत्या वस्तू मिळाल्या हे आपणास सांगण्याचा उद्देश नाही. उद्देश हा की मिळालेले पुरस्कार आणि शाबासकी आपल्याला नविन काम करण्यास प्रेरणा देतात.

"प्रेरणा घेण्यासाठी जगात खूप काही बदल होणे किंवा मोठी घटना घडणे अपेक्षित नसते. आपण जर अशा घटनेची वाट पहात बसलो तर वेळ आणि आपले वय निघून जाईल."

Be an inspiration:-   

प्रेरणा लहान-सहान गोष्टीतून,घटनेतून घ्या. अशा गोष्टी,घटना आपल्या परिसरातील असतील तर अधिक फायद्याचे. कारण आपण त्या परिसरातील असल्यामुळे त्यां किती खरी- खोटी हे तात्काळ समजते. यश मिळवणारी व्यक्ती आपल्या परिसराचा असल्यामुळे त्या व्यक्ती कडून अचूक मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळू शकते.

 

     चला आपापल्या परिसरात भ्रमण करूया, यशस्वी होण्यासाठी परिसराकडून प्रेरणा घेऊया.

 

लेख कसा वाटला हे comment करून नक्की सांगा.

 

11 comments:

 1. खुप प्ररणादायी लेखन

  ReplyDelete
 2. प्रेरणादायी वाटचाल...लेखन खुपच प्रेरणादायी आहे...लेखनात कधीही खंड पडू देऊ नकोस...तुझ्याकडून खुपकाही शिकावयास मिळतं.

  ReplyDelete
 3. Replies
  1. Thanks..... तुमच्या blog ची link share करावी.

   Delete
 4. खूपच छान व प्रेरणादायी

  ReplyDelete
 5. तुला खुप शुभेछया खरंच छान लिखाण आहे

  ReplyDelete