Friday, August 20, 2021

Educational Tricks: Coverage Point

 Educational Tricks: Coverage Point 

 

   Coverage point  शैक्षणिक जुगाड.

   Coverage point Educational TRICK

 

      जग दिवसेंदिवस अफाट प्रगती करत आहे. प्रगतीसाठी जगात प्रत्येक घटकांने यश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच मागील दोन वर्षापासून पूर्ण जगाला जीवघेण्या रोगाने मनुष्याला जगण्यासाठी हतबल केले आहे. कोरोना हा रोग जितका भयंकर आहे, तितकाच एक प्रकारे मार्गदर्शक ही आहे असं वाटते.  कारण या रोगाने मनुष्याला जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा उपलब्ध करून दिल्या. खरच या जीवघेण्या रोगाने आपल्या जवळच्या माणसांचे महत्त्व पटवून दिले.

  शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया अस आपण म्हणतो. परंतु याच शिक्षणाला Lockdown च्या काळात जेल बंद व्हावं लागलं. परंतु Digital माध्यमाने दुसऱ्या मार्गाने का होईना पुन्हा दरवाजे उघडून दिले. Lockdown च्या काळात शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल झालेले दिसून आपल्या सर्वांना दिसून आले. त्यातला पहिला बदल म्हणजेच Digital शिक्षण. डिजिटल शिक्षण हे गोंडस नाव सर्वांच्या तोंडी काही क्षणात, काही दिवसात भरपूर Viral झालं. आणि आजही ते प्रत्येकाच्या तोंडी गुणगुणत आहे. नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे डिजिटल शिक्षणाला सुद्धा दोन्ही बाजू दिसून आले.ज्या ठिकाणी Coverage आहे तिथे हे आरामात विद्यार्थ्यांना मिळू लागले. परंतु ज्या परिसरामध्ये Mobile network, Mobile coverage उपलब्ध नाही तिथे मात्र Digital शिक्षण हे फक्त शब्दांपुरतं मर्यादित राहील.

  Digital शिक्षणाला खरे बळी पडले ते म्हणजे दुर्गम भागात काम करणारे शिक्षक आणि विद्यार्थी. अतिदुर्गम भाग,डोंगरदऱ्यांचा परिसर त्यात भर म्हणून  Mobile ला उपलब्ध न  झालेले Coverage. एका बाजूला शासनस्तरावरून होणारे वेगवेगळे प्रयोग, त्या प्रयोगाला अनुसरून येणारे परिपत्रके. शिक्षकांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग,विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण आणि….. असे एक ना एक दररोज काही ना काही नवनवीन मोबाईलच्या माध्यमातून पदरी पडणे चालूच आहे. 

  

  या सर्व तारेवरच्या कसरतीत माझा शिक्षक तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. पण हा माझा शिक्षक काहीकेल्या हार मात्र मानणार नाही. "गरज ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं जातं त्या प्रमाणे दुर्गम भागातील शिक्षकांनी स्वतः व विद्यार्थ्यांना प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग व मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातलाच हा एक प्रयोग…………

 

Educational Trics: Coverage Point

      वरील फोटोत एक वीट ठेवलेलं आहे. त्या विटेवर एक मोबाईल ठेवण्यात आला आहे. आता प्रश्न पडेल की वीट वर मोबाईल ठेवल्यानंतर काहीतरी चमत्कार होईल. तर हो….हा एक चमत्कारच आहे. 

      नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात दुर्गम भागात वसलेले वालंबा हे गाव. या गावचा परिसर म्हणजे डोंगराळ आणि अतिदुर्गम भागाचा. परिसरात दळणवळणाचं माध्यम म्हणजे रस्ता. पण मित्रहो हा रस्ताच जीवंत नाही तर मोबाईला Coverage असणं लांबची गोष्ट. जनसंपर्क व गरजांची पूर्तता म्हणून मोबाईल फोन हे माध्यम वापरले जाते. परंतु या भागात संपर्क साठी लोकांना उंचच उंच डोंगर शोधावे लागतात. अशात जे coverage मिळते ते गुजरात राज्याचे (आभार गूजरातचे). संपर्कासाठी रात्री बे रात्री या पावसाळ्यात डोंगर टेकड्यांवर जाणे जिकिरीचे. अशात आपल्या शालेय परिसरात Coverage येणं म्हणजे सोन्याहून पिवळे झाल्याची feeling होते. कुठे coverage मिळाले तर एखादा Call करून पाहिला जातो. पण बोलता बोलता थोडं जरी हालचाल झाली की गेलं coverage. Coverage हा ऊन सावलीचा खेळ नेहमीच दगा देतोय. अशातच वालंबा परिसरातील केंद्र- वालंबा ( H) अंतर्गत असलेल्या अनु.प्राथ/माध्य.शाळा वालंबा या शाळेतील शिक्षकांना मात्र एक अप्रतिम अशी युक्ती सुचली. 

         ज्या जागेवर coverage मिळाले त्या जागेला Coverage Point बनवायचं. त्या जागेवर विट किंवा मोबाईल ठेवण्या योग्य वस्तू ठेवायची. त्या विटेवर मोबाईल ठेवायचा. मोबाईलचा Hotspot / WiFi सुरू करून इतर computer, laptop ही साधने वापरून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे. आहे ना चमत्कार.
          शिक्षण म्हटले की सर्वांना काहीतरी नवीन बदल हवा असतोच. शिक्षणा बरोबर प्रत्येक क्षेत्रात नवनवीन बदल होतांना आपण पाहतो. आज चं Digital आणि Viral युगात तर Smartphone मुळे दररोज नवीन फोटो,video या Social media वर viral झालेले तुम्ही आम्ही पाहिलेले आहेत. स्वत: ला trending मध्ये आणण्यासाठी काहीन काही भन्नाट क्लूत्या प्रत्येक जण करतोय. परंतु शिक्षण विभागात मात्र viral पेक्षा उपयोगाचे होणे जास्त महत्वाचे मानले जाते. परंतु ही चांगली व समाजपयोगी कामे झाल्याचे मात्र निवडक ऐकु येतात. 

            

  एखादं काम करायचं म्हटलं तर त्या कामाची व्याप्ती आणि होणारा त्रास लक्षात आल्यावर प्रत्येक जण पळवाटा काढायला सुरुवात करतो. पळवाटासाठी  मार्ग शोधू लागतो अशावेळी काम नाकारण्याच्या भरपूर मार्ग सापडतात.‌ शिक्षण क्षेत्र आणि आजचं Covid-19 यूक्त वातावरण पाहता. प्रत्येक जण भितीपोटी का होईना काम न करण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात दुर्गम भाग म्हटलं की काम न करण्याची एक चालून आलेली आयती संधी असते. दुर्गम भाग आहे, रहदारी साठी रस्ते नाहीत,अशा वेळी Mobile coverage नसताना आम्ही काम तरी कसे करावे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कोणत्या मार्गाने आम्ही द्यावं. अशी एक ना एक पळवाटा ची मार्ग आणि कारणे सहज उपलब्ध होतात. 

            काम न करण्याचे भरपूर मार्ग असतात हो!..परंतु काही अवलिया मात्र अशा अडचणींचा issues न बनविता मार्ग शोधतात. शिक्षण सर्वांसाठी आहे. गरीब असो की श्रीमंत शिक्षण सर्वांना मिळावे करीता झटतात. आणि आपल्या प्रयोगात यशस्वी होतात. 

  वरील प्रयोग त्या सर्व परिसराला लागू होतो. जिथे खरच Coverage ची मोठी अडचण आहे. आपण ही शिक्षण प्रेमी असाल. तर अडचणीचं रडगाण गात बसण्यापेक्षा आपल्या परिसराचा सर्वे करा. कुठे Coverage सापडले की बनवा तेथे आवडीच Coverage Point. गरज तेथे शोध. याप्रमाणे…..

 

                                  हा जुगाड परिसरात चांगलाच प्रसिद्ध आहे. 

 

              या ( tricks) चा शोध लावणाऱ्या माझ्या शिक्षक बांधवांना मानाचा मुजरा….

 

6 comments:

  1. लागलेला शोध आणि केेलेले वास्तवदर्शी लेखन अप्रतिम आहे. लेख वाचतांना स्वत: अनुभव घेतल्याचा भास होतय. अप्रतिम.

    ReplyDelete
  2. अतिसुंदर लेख अभिनंदन सरजी

    ReplyDelete
  3. सुंदर शब्दांकन व अप्रतिम लेखन वास्तव परिस्थितीला अनूसारून छान अभिनंदन गणेशजी

    ReplyDelete