Sunday, August 29, 2021

आत्मनिर्भर : Self- reliant

 आत्मनिर्भर : Self- reliant

 

         वरील शब्द या कोरोना (Covid-19) काळात सर्वांच्या परिचयाचा झालेला शब्द. आत्मनिर्भर या शब्दाचा उच्चार होताच सर्वांना स्व:ची जाणिव व्हायला वेळ लागणार नाही. ( राजकीय वळण वगळता) 

         आत्मनिर्भर हा एक शब्द नसून वैचारीकता आहे.  शब्दाला समजुन घेतलं तर जगण्याचा सारं समजल्याचा भास होईल. अशक्य ते शक्य होण्यास वेळ लागणार नाही. फक्त शब्दाला समजून जगता आले म्हणजे झाले. 

 स्वतंत्र भारत निर्मिती नंतर भरकटलेल्या जनतेला, कामगारांना एकत्रित होऊन जगण्यासाठी व स्व:तच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वावलंबी व्हा ! असे आव्हाहन केले गेले होते. स्वावलंबी व्हा ! हा नारा कोणी दिला हे सर्वाना माहिती आहे. स्वावलंबी होणे याच शब्दाला समांतर शब्द म्हणजे आत्मनिर्भर.

       आत्मनिर्भर विषयक तसे खुप सारे ताजे व जीवंत उदाहरण आज समाजात नकळत घडतांना दिसतात. काही लक्षात राहतात तर काही सहज विसरले जातात. हा विषय सर्वांसाठी जितका जिव्हाळ्याचा, तितकाच प्रोत्साहन देणारा सुद्धाआहे. या विषयावर लिहायला ठरले होते, तशी घटनाही माझ्या समोर घडली होती. परंतु प्रत्यक्ष लेखणीत उतरायला थोडा उशीर झाला. आत्मनिर्भर पणे जगणे हे जितके गर्भ श्रीमंत लोकांना जमते. तितक्याच प्रखरपणे आत्मनिर्भरता रक्तारक्तात संचारले आहे ते म्हणजे हातावर जगणाऱ्या लोकांत. म्हणतात अंगावर आलं की माणूस मार्ग शोधतो आणि सुरू होते तडजोड. या तडजोडीचा शेवट म्हणजे यश. यश मिळाल्यावर जन्माला येते ते म्हणजे आत्मनिर्भरता. एकदा माणूस आत्मनिर्भर झाला की समजा तो कधीही, कुठेही हार मानणार नाही. कदाचीत याच कारणानं आत्मनिर्भर या शब्दाला इतकं महत्व प्राप्त झालं असावं. 

           मित्रहो Lockdown चा फटका सर्वांनाच बसला आहे. यात तुम्ही- आम्ही कोणीही सुटलो नाही. लहान- मोठे सर्वच याची शिकार झालो आहेत. Lockdown चाच फटका म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद आणि वरून पावसाने घेतलेला ब्रेक पाहता  सर्व लोकं निकामी झाले. कडक उन्हाचा मे महिना संपून जून उजाडला. नेहमी प्रमाणे पावसाळा सुरू झाला. राज्यात सर्वत्र पावसाचं वातावरण आहे. कमी-जास्त प्रमाणात प्रत्येक भागात पावसाने हजेरी लावली. परंतु उत्तर महाराष्ट्रातील सातपुडा मात्र कमी पावसामुळे तहानलेलाच आहे. पावसाने मारलेल्या दांडी मुळे पावसाळ्यातली कामे रखडली. पावसाने घेतलेला ब्रेक पाहता शेतकऱ्यांत सर्वत्र निराशा दिसून येत आहे. अशात शाळा बंद असल्यामुळे आपली मुलं घरी रिकामीच दिसत आहे. शिक्षण जरी Online असलं तरी Coverage व आवश्यक वस्तू नसल्याने शिक्षण नसल्यासारखे आहे. प्रत्येक पालक स्वतः ला हातभार म्हणून आपापल्या पाल्यांचा आधार घेत आहे. पालक आपल्या मुलांना हव्या त्या कामात मदत म्हणून सोबतीला ठेवत आहे. घरकाम व पालकांना आधार म्हणून शालेय विद्यार्थी म्हणजे सर्वांसाठी *सांगकाम्या* झाला. हा पालकांसाठी तर हुकूमी इक्काच. पालक या शालेय मुलांना हवी ती कामे सांगत आहेत. मग ती कामे कोणतीही असो. या कामांच्या यादीत *गुरं-डोरं चारणे* हे पहिल्या नंबर वरचं हक्काचं काम. आपल्या दुर्गम भागात तर हे काम शालेय मुलांसाठी हक्काचं काम होऊन बसले आहे.  शाळा बंद असल्यामुळे बहुतेक मुले गुरं सांभाळतांना डोंगर टेकड्यांवर दिसत आहेत. 

         आता वळूया *आत्मनिर्भर* या गुणी शब्दाकडे. 

 

आत्मनिर्भर : Self-reliant

 

            वरील फोटो हा सातपुड्यातील गाव/पाड्याच्या ओसाड जागेवर पसरलेल्या टेकड्यांवरील आहे. या परिसरात छोटी झुडपे व्यतिरीक्त आसपास मोठाली झाडं नाही. मोठी झाडं नसल्यामुळे आणि पावसाळी ऋतू असतांनाही पाऊस नसल्याने कडक ऊन पडतं आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना या परिसरात वावरतांना सावलीसाठी वणवण भटकावे लागते. 

    वरील फोटो पाहताच तुम्हाला दिसून येईल.....

 चार काड्या आणि जवळच्या झाडा-झुडुपांतील पानांचा वापर करून या कडक उन्हात सावलीसाठी तयार केलेली छानदार झोपडी.

  

             ही झोपडी या फोटोतील मुलांने स्वतः बनवली. या साठी लागणारे कष्ट आणि चलाखी या मुलाची. झोपडी अशा ठिकाणी बनवली की आपली गुरं ही एका नजरेने दिसतील आणि परिसरही. वय वर्ष फक्त ११ ते १४  दरम्यान.

 

    वय इतकं लहान असतांना वडिलांनी सोपविलेले काम ही करणे आणि स्वतः चे आरोग्यही साभाडणे. ही दोन्ही जिकरीची कामे कोणतेही नकारात्मकता न दर्शविता सहजतेने करणे.

     हे फक्त या आपल्या खेडे-पाड्यांवरील मुलांना सहज जमतं.

 आणि हेच कौशल्य म्हणजेच आत्मनिर्भर.

6 comments: