Tuesday, March 16, 2021

School Activities : शालेय उपक्रम

 School Activities : शालेय उपक्रम

       शालेय शिक्षण आणि शालेय उपक्रम या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक, समांतर आणि संलग्न आहेत. शिक्षण नुसते पुस्तकी ज्ञान देऊन पूर्ण होत नाही. शिक्षणाला खरा अर्थ तेव्हा प्राप्त होतो, जेव्हा अर्थपूर्ण असे शिक्षण प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून दिले जाते. हे अर्थपूर्ण शिक्षण तेव्हाच पूर्ण होते, जेव्हा तुम्ही शालेय स्तरावर वेगवेगळे मनोरंजक उपक्रम घेतात. तुम्ही घेतलेले उपक्रम परिसरानुसार, परिस्थितीनुसार, विध्यार्थी हित जोपासत घेतले तर अधिक प्रभावी ठरतात. 

                   मार्च 2020 पासून COVID-19 या महामारीमुळे शाळा बंद झाल्या. या कालावधीत विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा कशा पूर्ण करता येतील या विषयी केलेला छोटासा प्रयत्न.......

School Activities: शालेय उपक्रम


प्रस्तावना:- 

 

           मार्च 2020 या महिन्याची सुरुवात आणि…….पूर्ण जग एका ठिकाणी एका निर्जीव वस्तू प्रमाणे स्तब्ध झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे covid-19 हा जीवघेणा संसर्गजन्य रोग. या रोगाने अल्पावधीतच इतका थैमान  माजवला की जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) ला या रोगाला  महामारी म्हणून घोषित करावे लागले आणि सुरू झाले lockdown.

 

         Lockdown  चा परिणाम म्हणून जगातील लहान-मोठी सर्वच शहरे बंद पडली. सोबतच राज्य,जिल्हा, तालुका असे करता करता लहानातली लहान खेडेगाव सुद्धा यादीत आले.

पाहता पाहता  पूर्ण जग lockdown च्या छायेत आहे. Lockdown चा ज्याप्रमाणे छोट्या-मोठ्या सर्व कामावर परिणाम झाला, त्याचप्रमाणे त्याचा फटका शाळेवर ही बसला. जगातील सर्वच शाळा, महाविद्यालये बंद पडल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र ऐरणीवर आले.

          अशातच नेहमीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2020-21 जून 2020 या महिन्यात सुरू झाले. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने 'शिक्षण महत्वाचे' म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, याकरिता बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 या संदर्भाचा विचार करून वर्गातील शिक्षणाला पर्याय म्हणून Online शिक्षणाला प्राधान्य दिले.

Monday, November 2, 2020

How to inspire small things. लहान-सहान गोष्टीतून प्रेरणा कशी घ्यावी.

 

How to inspire small things.

लहान- सहान गोष्टीतून प्रेरणा कशी घ्यावी.

 

          स्पर्धा सर्वच विभागात पाहायला मिळतात. असा एक ही विभाग नाही की  तुम्हाला स्पर्धक भेटणार नाही. स्पर्धेत तोच अव्वल ठरतो जो इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करतो. त्याचं काम इतरांपेक्षा प्रभावी दिसतं. कामातील वेगळेपण हे त्याच्या कौशल्यावर अवलंबून असते. कामातील वेगळेपण, विशेष कौशल्य हे त्याच्या कामातील प्रामाणिकपणा, मेहनत आणि मिळालेल्या प्रेरणेने शक्य असते.

    निवडलेल्या कामामध्ये यश मिळावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागेल. कामातील सातत्य टिकून राहण्यासाठी तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहनाची नितांत गरज असते.

       जगात आपल्या व्यवसायात किंवा शाखेत उस्फुर्त असे यश मिळविणाऱ्या व्यक्तींची नावे आपणास माहिती आहेत. यशस्वी लोकांची यादी करण्याचे म्हटल्यास जसजशी कामाची व्याख्या बदलेल तसतशी यशस्वी लोकांचीही यादी वाढतच जाईल.

Technology हा विषय आज सर्वांचा आवडता झाला आहे. Technology फक्त एक विषय नसून तो एक व्यावसायिक दृष्टीकोन झाला आहे.

 Technology हा विषय निवडला तर या विषय आणि विषयाशी संबंधित व्यवसायात यश मिळविणाऱ्या व्यक्तींची यादी Google वर search करून पाहिली तर जगात Top-10 यशस्वी व्यक्ती कोण आहेत हे तुम्ही पाहू शकता. Jeff bezos , Bill gates, Larry Ellison, Mark Zuckerberg, Steve jobs, Larry Page….. अशी नावे वाचायला मिळतील.

What can inspire a person:-

      या यादीतील आपल्या नेहमीच्या परिचयाची नावे कोणती? का? असा प्रश्न विचारला तर आपसूक होऊन आपण त्यांची नावे Bill gates, Steve jobs, Mark Zuckerberg….. अशी सांगू. जगातील यशस्वी top 10 व्यक्ती मधून आपल्या भारतात या तीन व्यक्तींविषयी जास्त search केले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. Microsoft, Apple mobile आणि Facebook  यांचा जगाप्रमाणे भारतातील वाढता वापर. Top 10 मधील इतर व्यक्ती आणि त्यांच्या कंपनी ही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

 

How to inspire small things.

    वरील परिच्छेद मध्ये जगातील technology मधील यशस्वी झालेल्या नामवंत व्यक्तींची यादी सांगितली. या यादीतील लोकांनी टेक्नॉलॉजीमध्ये जगात स्वतःचं स्वतंत्र असे स्थान निर्माण केले आहे. जगात स्वतःला अव्वल नेण्यासाठी या व्यक्तीने अतोनात मेहनत केली असेल, हे त्यांच्या प्रसिद्धीवरूनच कळते. प्रश्न असा निर्माण होतो की या यशस्वी व्यक्तीने हे यश कसे मिळविले असेल? यासाठी यांनी कोणकोणत्या मेहनती केलेल्या असाव्यात?  या प्रश्नाच्या उत्तरांसाठी प्रत्येक जण या प्रसिद्ध व्यक्तींच्या success story ऐकतात किंवा वाचतात. success story वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्याची स्वप्ने पाहतो आणि रंगवतो.

Friday, October 23, 2020

Online Search कितपत फायदेशीर ठरू शकते ?

 Online Search कितपत फायदेशीर ठरू शकते ?

 

Online Search करणे हा नवा Trends समाजात रूढ होताना दिसतोय किंवा झालेला आहे.  आज कोणत्याही अर्थपूर्ण किंवा निरर्थक गोष्टीची माहिती घ्यायची म्हटलं तर कोणीही सहज "Google", "YouTube" वरती Online Search करताना आपण पाहतो.

Online Search करण्यामध्ये सगळ्यात जास्त 

Open Source software चा वापर केला जातो.  Google, YouTube आणि इतर.

 

गरज ही शोधाची जननी आहे. हे आपण ऐकले, अनुभवले आणि शिकलो आहे.  Online search करताना शोधण्याची कोणतीही Limitations नसतात. Search काय करावं आणि काय करु नये हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो.

बहुतेकदा निरर्थक व अडचणी आणणारा गोष्टीचा Search केला तर त्याचं नुकसान ही बहुतेक लोकांना भोगावे लागले आहेत. अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळालेल्या असतील.

Search करण्याला काही बंधने असावीत, तशी गरज समाज सुरक्षा म्हणून ती प्र शासनाने लावली. हे खरंच आवश्यक आणि गरजेचे होते. आणि ते आहे सुद्धा

Internet चा आपल्यासारखंच मी ही चाहता. सर्वां प्रमाणे मी ही Google, YouTube  वरती माहिती  Search करत असतो. Search करण्याचे बंधन लक्षात ठेवून मी ही वेगवेगळ्या शैक्षणिक आणि समाजिक विषयावर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.

 Search करण्याची बंधनं पाळले त्यामुळे नुकसानास आज सुद्धा मी पात्र ठरलेलो नाही, याचा आनंद आहे.


 


             Google, YouTube प्रमाणे Quora हे एक छान Search माध्यम आहे. Quora सुरुवातीला मला फक्त प्रश्नोत्तरांचा ठिकाण आहे असं वाटत होतं. परंतु हळूहळू त्यावर वेगवेगळ्या प्रश्नांची दर्जेदार उत्तरे ती ही मुद्देसूद वाचायला मिळू लागली. त्यामुळे मी खूप प्रभावित झालो. वेगवेगळ्या विषयावरील वेगवेगळे प्रश्न एकाच ठिकाणी, एकाच मंचावर उपलब्ध होत असतात. समाजात किती नामवंत आणि हुशार व्यक्ती आहेत जे आपल्या विचारांच्या पलीकडे प्रश्न विचारू शकतात आणि त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तितकीच मुद्देसूद आणि विचार करायला लावणारी त्याचबरोबर त्या उत्तरांना संदर्भासह असणारे उत्तरे वाचायला मिळणे हा एक प्रकारचा विलक्षण लाभ.

Tuesday, February 18, 2020

Benefits of inspiration? प्रेरणेची फायदे ?

Benefits of inspiration? प्रेरणेची फायदे?

      जीवनात यशस्वी होण्यासाठी कुणाकडूनही मिळालेली प्रेरणा महत्वाचे काम करत असते. व्यक्ति कोणत्याही कामात, स्पर्धेत किंवा जीवनात यशस्वी झाल्यावर आपण जाणीव पूर्वक त्याच्या प्रेरणास्थाना विषयी विचारतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रेरणा [ inspiration, motivation ] ही महत्वाची भूमिका बजावत असते. कुटुंबात प्रेरणास्थान म्हणून आईला मान देणारे आपण खूप पाहिले, ऐकले असेलच.

अच्छी किताबे और अच्छे लोग, तुरंत समजमे नही आते. उन्हे पढना पडता है |

                    वरील प्रकारची वाक्ये आपल्याला नेहमी  वाचायला मिळतात. अशी प्रेरणादायी वाक्ये आपल्याला मार्गदर्शक ठरतात.
     आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त आहे. व्यवसाय चांगला चालावा, परीक्षेत चांगले गुण मिळावेत, कुटुंब सुखी राहावे, मला यश मिळावे करिता झटत असतात. अशावेळी एखाद्याने मार्गदर्शन केले की आपल्याला मोठी प्रेरणा मिळते. परंतु भेटलेली प्रत्येक व्यक्ति आपल्याला मार्गदर्शन, प्रेरणा देईलच असे नाही. कामात सातत्य आणि यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला आज कुटुंब, मित्र किंवा वरिष्ठांकडून प्रेरणा, प्रोत्साहन, मार्गदर्शन, आधार मिळणे गरजेचे झाले आहे.
Benefits of inspiration:-
     प्रेरणेचे खूप सारे फायदे आहेत. जसे-
                      # प्रेरणेमुळे आपल्याला स्फूर्ति मिळते.
                      # प्रेरणेमुळे आधार मिळतो. 
                      # प्रेरणेतून चालना मिळते. 
                      # कृती /क्रिया करण्यास बळ मिळते. 
                      # प्रेरणेतून मानसिक आरोग्य सुधारते. असे कितीतरी फायदे प्रेरणेतून आपल्याला मिळतात.
The value of inspiration:-
प्रेरणा कुठे?, कोणाकडून?, केव्हा मिळेल?  यासाठी विशिष्ट व्यक्ति, वेळ किंवा जागा असण्याची गरज नाही. जीवन प्रवासात भेटलेला प्रत्येक व्यक्ति,प्रत्येक वेळ, जागा आपल्याला प्रेरणा देऊन जात असतात.
inspiration,motivation,inspireus,moral,culture,art,lifestyle,photography,article
              वरील फोटो आपणास प्रेरणादायी ठरू शकतो. कारण कलाप्रेमीने आपली कला आणि संस्कृती दोन्ही जोपासल्या आहेत. ते ही एका शेतीच्या बांधावर. ही concept प्रेरणा घेण्यासारखी आहे.

Tuesday, January 21, 2020

Memories ....lets keep आठवणी... चला जपूया.

Memories...lets keep   आठवणी... चला जपूया 

आठवणी म्हटले की प्रत्येक जण स्तब्ध होतो, आपआपल्या जीवनात घडलेल्या घटना आठवण्यात मग्न होतो. या आठवणी असतात तरी कशा, या  आठवणी इतक्या का महत्वाच्या असतात. तर.....आठवणी म्हणजे भूतकाळाला उजाळा देणे.मग भूतकाळ आनंदी असो की वेदनादायक... वर्तमानात हाच भूतकाळ आठवणीरुपी प्रोत्साहन देत असतो.
म्हणतात....

आठवणी पासून पाठ फिरवू नये.कारण माणूस आठवणीवरच अधिक जगतो. आठवणी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. परंतु प्रोत्साहन मात्र आठवणीच देतात .

memories,art,photography,childhood,motivation,lifestyle,inspiration,moral
वरील pencil skach पाहता तुमच्याही आठवणी जागृत झाल्या असतीलच. 
म्हणतात आठवणी जपल्या पाहिजेत, आठवणी जपणे का चांगले किंवा फायद्याचे असते. 
चला पाहूया. 

Saturday, January 4, 2020

2020 NEW YEAR RESOLUTION / 2020 संकल्प नवीन वर्षाचे

2020 New Year Resolution / 2020 संकल्प नवीन वर्षाचे: 

वर्ष 2019 पाहता- जगता संपले आणि नेमकेच 2020 वर्षाचा प्रारंभ झाला. मागील वर्षात कितीतरी चांगल्या- वाईट घटना आपल्याबरोबर घडल्यात. त्यात काही फायद्याच्या तर काही शिकवून जाणार्‍या ठरल्या असेलच.
     नव्या वर्षाची चाहूल म्हणा की सुरुवात... वर्ष सुरू होताच नवनवीन संकल्प resolution प्रत्येक जण करत असतो.
संकल्प करण्याचा हेतु सरळ आहे. मागील वर्षातील राहिलेली अपूर्ण कामे किंवा ध्येय, स्वप्नं, लक्ष्य या वर्षात नव्या उत्साहाने, नव्या प्रयत्नाने पूर्ण करण्यासाठी योग्य निश्चय किंवा नियोजन करणे. 
तर पाहूया या नवीन वर्षाचे संकल्प.
2020 New Year Resolution / 2020 संकल्प नवीन वर्षाचे: 


या नव्या वर्षात नवनवे संकल्प केलेच असतील. उदा.......
   सकाळी वेळेवर उठणे,
 व्यायाम करणे, 
वजन कमी करणे, 
अभ्यास करणे,
 कर्च कमी करणे, 
आई- वडिलांशी संवाद साधणे,
 व्यसन सोडणे, 
असे कितीतरी संकल्प आहेत. ज्याची यादी तुमच्या आवडी- निवडी नुसार वाढू शकते किंवा बदलू शकते. परंतु यापेक्षा वेगळा संकल्प तुम्ही कधी करून पहिला का ? जसा मी आज सांगणार आहे. चला पाहूया.

      प्रत्येक जण आपापल्या जीवनशैली नुसार प्रपंच ठरवून जगतात. प्रत्येक जण कामात व्यस्त आहे. नोकरी करणे, व्यवसाय करणे किंवा इतर....हे सततचे काम बहुतेकदा कंटाळवाणे वाटते. या कामातून थोडा आराम मिळावा किंवा 'हवा पाणी बदलणे' असे म्हटले जाते याप्रमाणे , थोडा वेळ काढून स्वत:ला देणे.

resolution,2020,new_year, motivation,inspiration,moral,art,photography,
हा फोटो पाहता हवा पाणी बदलणे याचा अर्थ जाणवला असेलच........
     मला सर्वांनाच प्रश्न होते.........
          आपण कधी स्वत:ला वेळ दिला का?
              स्वत:साठी कधी जगले का?
                कधी लहान होऊन Unseen Life जगावीशी वाटली का? 

Saturday, December 28, 2019

LAUGHTER IS THE BEST MEDICINE. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे.

LAUGHTER IS THE BEST MEDICINE. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे. 
  आजची वाढती धावपळ, कामे , प्रवास, ताणतणाव, अभ्यास, परीक्षा, कुटुंब अशा हजारो कामांत माणूस अडकलाय. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे. हे माहिती असतांनाही जीवनरूपी चक्की पिसण्यातच आपण हास्य विसरुन बसलोय.
     स्मितहास्य smile शब्दातच किती गोडवा आहे. एखाद्याने दिलेले स्मितहास्य किती ऊर्जा देऊन जाते.

एका मराठी दैनिकात वाचायला मिळालेले छान असे वाक्ये...
     निखळ, निर्मळ, हास्य हे मानवाला मिळालेले वरदान आहे. ज्याचे हास्य कुठल्याही प्रसंगात टिकून राहतं, तो योग्य तो निर्णय घेऊ शकतो. म्हणूनच स्थिर आयुष्य जगू शकतो.
happy,smile,laughter is the best medicine,laughter,medicine,laugher is the best medicine,why laughter is the best medicine,is laughter the best medicine,essay on laughter is the best medicine for class 5,essay on laughter is the best medicine for class 4,essay on laughter is the best medicine for class 6,essay on laughter is the best medicine for class 7well,comedy,joyful,photography,motivation,inspiration,moral,art,medicine

           हा  फोटो स्मितहास्य विषयक तुम्हाला inspiring ठरू शकतो.

हसणे म्हणजे फक्त मजा नसते. हसण्यापलीकडे बरच काही असते. जेव्हा तुम्ही मित्रात किंवा कुटुंबात एकत्र येऊन मनसोक्त, मनमुराद हसतात. तेव्हा तुमच्यात संवाद होतो. एकमेकांची जाणीव व सहवास लाभतो. तुम्ही एकमेकांना समजून घेतात. हे हास्य तुमच्या मनाला जोडते .
 आपले मित्र, कुटुंबातील वरिष्ठ व नातलग आपल्याला आनंदी राहण्याचा सल्ला देत असतात. आपणही तितक्याच आत्मियतेने तो सल्ला स्वीकारतो . परंतु जगत मात्र नाही. मित्रहो आनंदी राहण्याचे कितीतरी फायदे आहेत.
       जसे-
  • मन आनंदी राहणे.
  • मन भयमुक्त राहणे. 
  • शरीर रोगमुक्त राहणे . 
  • हृदय तणावमुक्त राहणे. 
  • सहज नवीन मित्र जोडता येणे. 
     मन प्रसन्न राहणे. असे कितीतर फायदे आहेत या हसण्याने, स्मितहास्याने .......पण वाढत्या कामाच्या तणावाने आपण विसरुण बसलोय. हा आनंद पुन्हा मिळवणे सोपे आहे. कसे-

Wednesday, December 11, 2019

एकलकोंडेपणा....टाळता येईल. Monotony...can be avoided

एकलकोंडेपणा ...टाळता येईल.
Monotony... can be Avoided .....

मनमिळाऊ माणसे सर्वांनाच आवडतात. मित्रात, कुटुंबात ते हवे-हवेसे वाटतात. परंतु या लाखों लोकांच्या गर्दीतही खूप सारे लोकं एकटे, अलिप्त, एकलकोंडे राहतांना आपण पाहतो . घरात, मित्रात, चारचौघात मिसळून राहायला त्यांना आवडत नाही. तुम्हाला अशाप्रकारे कधी वाटले का ?
monotony,boaring,dull,depression,dreary, motivation,Art,lifestyle,photograpty,moral

        आपल्या परिसरात असे खूप सारे लोकं एकलकोंडे, अलिप्त राहताना जाणवतात. अशा अलिप्त Alone सवयीमुळे जीव धोक्यात आणणे,गमवणे अशा बातम्या नेहमी वाचण्यात येतात. एकलकोंडे व्यक्ति वरील painting प्रमाणे एकटे, boring, dull, alone पडलेले जाणवतात. जगापासून अलिप्त, एकलकोंडे निरुपयोगी आणि रिक्त? असे असल्यास निराश होऊ नका. असे वाचण्यात आले की हा काही घातक रोग नाही.

Tuesday, December 3, 2019

प्रार्थना...संस्कार घडविते / Pray....makes rites

प्रार्थना... संस्कार घडविते: / Pray.... makes Rites :
     प्रार्थना ही मानवी जीवनातील अनिवार्य आणि अविभाज्य असा घटक बनला आहे. प्रार्थना जणू जीवनशैलीचा एक भाग आहे असे म्हणायला हरकत नाही. ती सर्वत्र आहे  घरात ,शाळेत, बागेत, समूहात, देवळात, एकांतात आणि शुभ-अशुभ अशा प्रत्येक ठिकाणी प्रसंगानुरूप म्हटल्या जातात , ऐकायला मिळतात.
Pray,Rites,mendarory,inseparable,lifestyle,school,edu,photography,moral,art,
मागील लेखात आपण संयमाचे महत्व विषयक वाचले. त्यातून संयमाची क्षमता जाणली. आज आपण प्रार्थना विषयक वाचूया.
 प्रार्थना हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो.
 आनंदात किंवा दु:खात केलेल्या प्रार्थना वेगवेगळ्या असू शकतात. परंतू अर्थ एकच. काही विशिष्ट कार्यसिद्धिसाठी करण्यात येणारी कोणाची तरी स्तुती, यातना किंवा मागणी.
म्हणून प्रार्थना हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जात असल्यामुळे, प्रार्थना म्हणजे नेमके काय ? हे विशिष्ट शब्दात सांगणे कठीण वाटते.
        आपण पाहतो शाळा, कॉलेज मध्ये विध्यार्थांचा परिपाठ प्रार्थनेनेच सुरू होतो. परिपाठातील प्रार्थनेचा अर्थ सरळ आहे,त्यांच्यात चांगुलपणाची सवय निर्माण व्हावी. शिक्षण हे प्रगतीचे माध्यम असल्याने शाळेत प्रार्थना असणे योग्यच आहे. कारण
विशेष म्हणजे प्रार्थनेत प्रचंड ताकत असते. एकाग्रता , संयम वाढवण्यात प्रार्थना मोलाचा वाटा उचलते.
 माझ्या वाचण्यात आले....
हजारो वर्षापूर्वी ऋषि-मुनि, साधू-संतांनी प्रार्थनेची ताकत ओळखली. त्यातून अनेक प्रकारचे मंत्र, स्त्रोत आणि प्रार्थना निर्माण केल्या. या प्रार्थनेतून त्यांना जीवन आधार अनुभवला आणि तो जगलाही दिला.
प्रार्थनेचे महत्व आपण जाणले पाहिजे. वाढत्या स्पर्धेत व्यक्ति किंवा विद्यार्थी सर्वच ताणतणावात असतात. त्यात विद्यार्थी--त्यांना तर अभ्यास, अपेक्षांचे ओझे त्यातल्या-त्यात आदर्श जीवनशैलीच्या अपेक्षेने तर त्यांचे मन सैरभैर झालीत. माझी मुलं इतरांपेक्षा brilliant असावी. ती सर्वच क्षेत्रात चमकावीत. अशी प्रत्येक पालकाची इच्छा. त्यातल्या -त्यात अभ्यासाबरोबर ती सुसंस्कारी ही असावीत. मग संस्कार लागावेत करिता शिस्त लावणे सुरू होते . 

pray,prayer,lifestyle,motivation,moral,edu,last rites,rites,funeral rites,prayer,prayer meet,cleansing rites,vidya, sinha last rites,morning rites,gaelic polytheist rites,comunion rites,prayer meet video,prayer and fasting,rites chapter,chthonic rites,living on a prayer,black mass prayer,vidya sinha prayer meet,fasting and prayer,book of common prayer,forces of hades,rites of investiture,rites of the black mass,rite,st. lukes,exclusive,humanities,praise,theschool,art,photography
लहान मुलं specialy student यांच्या दररोजच्या ताणतणावाला कुठेतरी विराम मिळवा करिता प्रार्थना नक्की मदतीची होईल. कारण शाळा, tutions आणि homework यांचा ताळेबंद ते कसं ठेवत असतील हा ही विचार करायला लावणारा प्रश्न.
 संस्काराचा मूळ पाया म्हणजे "शिस्त". यात प्रत्येक कृतीला शिस्त, नियम घालून घेतले जाणे अति अपेक्षित असते. परंतु बहुतेकदा शिस्तचा मार्ग बदलला किंवा अति शिस्त होऊ लागल्यावर विरोध, बंड ,negetivity निर्माण होऊ शकते.
प्रार्थना मात्र हळवी असल्याने यातून विरोध निर्माण होणे अशक्य आहे. प्रार्थनेला अध्यात्मतेची जोड असल्याने व्यक्ति कृतज्ञता व्यक्त करू लागतो. चांगल्या, प्रामाणिकतेला प्रथम प्राध्यान्य देऊ लागतो.
 स्वत: किंवा आपल्या मुलांत चांगले संस्कार निर्माण व्हावेत करिता आवडतील त्या प्रार्थना नक्की ऐका, ऐकवा. यातून मन समाधानी, शांत, सुसंस्कारी होण्यास मदत होईल.

चांगुलपणा आणि सुसंस्कारी मनाकरिता मी प्रार्थना करतो, आपण प्रार्थना ऐकण्यास, म्हणण्यास सुरुवात करतील.

हा लेख आवडला असेल तर नक्की सांगा , तसेच इतरांना ही वाचण्याठी share करा.

Sunday, November 24, 2019

Patience_The capacity of Accept. संयम _स्वीकारण्याची क्षमता.

Patience संयम म्हणजे फक्त वाट बघणे किंवा प्रतीक्षा करणे एवढेच नाही , तर प्रतीक्षा करत असताना आशावादी वृत्ती बाळगणे. एक मराठी आहे"संयम म्हणजे एक युद्ध...स्वत:च्या विरुद्ध...
patience,patience,be patience,having patience,impatience,lack of patience,be patient,types of patience,how to be patient,patient and patience,patience virtue,patience in life,patience is virtue,patience virtue video,patience in relations,patience in trouble poem devotional,patience increse technique,capacity,what is patience: how to be patient - a video message,patience is virtue in tagalog,patience is virtue means,संयम,wait,qoute,marathi,motivation,art,lifestyle,stengh,capicity,edu,photography,maharashtra_election_2019
.
Patience_The capacity of Accept :संयम_स्वीकारण्याची क्षमता :
      वरील सुरुवातीची दोन ओढीच वाक्य आज माझ्या नेमकेच वाचण्यात आले. हे वाक्य बहुतेकांना संभ्रमात टाकणारे वाटत असावे. परंतु वरील फोटोतील हावभाव[expression]पाहिल्यावर मात्र संयमाची खोली जाणवेल.
आवडीचे पदार्थ असो, की एखादी वस्तु ती स्वीकारताना कोणी थांब [wait ]म्हटले तर किती अवगड जाते. अशावेळी जो संयम दाखवला जातो तो काही युद्धापेक्षा कमी नाही. स्वत:च्या विरुद्ध.

संयम का गमावला जातो, त्याला कोणत्या गोष्टी करणीभूत असतात. या ऐवजी संयम कसा ठेवला जातो हे जाणणे जास्त महत्वाचे वाटते.
संयम म्हणजे आपल्या मनावर मिळवलेला ताबा. ज्याने आपण कितीही वाईट कृत्य करणार्‍या व्यक्तिबरोबर राहिलो तरी त्याच्या सवयी किंवा व्यसन आपल्याला जडत नाही.
संयमाचे खूप फायदे असतात. हे जबाबदारी स्वीकारल्यावर पटकन जाणवते. उद्याचा दिवस आजपेक्षा चांगलाही होऊ शकतो. परंतु आजचा वाद किंवा संकट दूर करण्यासाठी स्वत:वर संयम,मनावर ताबा ठेवणे फायद्याचेच असते. याचं ताजं उदाहरण.....

    आजच चालू महाराष्ट्राचे राजकारण...2019 सर्वांच्या नजरेने पाहिले ,ऐकले, समजले. एका रात्रीत सत्तेत उलथापालथ झाली. उद्याचा दिवस आपलाच आहे हे मनात ठेऊन झोपलेले नेते, पहाटे-पहाटे मोठ्या धक्क्याने जागे झाले. स्वप्नाच्या पलीकडे घडले असे News Channel, social media सांगू लागले.
परंतु मोठ्या धक्क्याने जागे झाल्यावरही ,मोठ्या संयमाने news channel आणि जनते समोर वावरणारे राजकारणी किती संयमी वाटत होते. हे संयम चे मोठे उदाहरण म्हणायला हरकत नाही.

वरील राजकारणाचा भाग एक उदाहरण म्हणून घेतला आहे..जास्त मनावर घेऊ नये.

संयम 
काही वेळा आपली चूक नसतानाही शांत असणे योग्य असते. जोपर्यंत समोरच्याच मन हलक होत नाही तोपर्यंत त्याची चूक लक्षात येणार नाही.
म्हणतात मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, परंतु तडजोड करायला शहाणपण लागते.

प्रसंग कसाही असो आपला तोल Balance जाऊ देऊ नका. कितीही अडचणी आल्या, संकटे आली, कुटुंब किंवा मित्रात शाब्दिक,आर्थिक चढ-उतार आले. त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या. हे लक्षात असू द्या...

                जो बदलता है.....वही आगे जाता है !

 
     
लेख कसा वाटला comment करून नक्की सांगा.

Friday, November 22, 2019

एकाग्रतेसाठी...बालपण देगा देवा / concentration the key of success

एकाग्रता concentration.. key of success म्हटले जाते. आपण एकाग्रता विषयी जाणून घेऊया.
 एकाग्रता;- regard,success, focus 
                      आज कोणी निवांत बसलेले ऐकायला मिळत नाही. सतत कोणत्या ना कोणत्या जीवनाच्या स्पर्धेत प्रत्येक जण उतरलेला आहे. यशस्वी success हा hashtag सतत trending वर आहे. यश मिळवण्यासाठी प्रत्येक जण धडपडतोय. पण ताणतणाव stress धावपळ rush असल्याने एकाग्रता टिकून राहिना.
       मागील लेखात आपण कौशल्यातून आनंद आणि कला जोपासणूक विषयी जाणले.
concentration,key,success, concentration,success,power of concentration,concentration music,art of concentration,the power of concentration,how to improve concentration,about concentration,ultra concentration mind for success,improve concentration,law of attraction success,increase concentration,law of attraction success formula,how to get success,success in life,how to increase concentration,
    एकाग्रता:
                 तुम्ही कोणत्याही व्यवसायात असो,नोकरदार असो किंवा नवशिके असो. तुमची कामाची आवड आणि नवीन गोष्ट शिकण्याची क्षमता. हे दोन्ही तुमच्या एकाग्रतेच्या क्षमतेवर अवलंबून असते. एकाग्रता, संयम टिकून राहावी, कामात यश मिळावे करिता प्रयत्नात असतात पण बहुतेकदा अडचणी येतात. ह्या अडचणी येण्याचे अनेक कारणे आहेत.
आपण थकलेलो असतो.
कंटाळलेलो असतो 
रुचि नसते 
अस्वस्थ वाटणे 
तणाव जाणवणे पण एकाग्रतेचा अभाव याचे मुख्य कारण म्हणजे बेबंद आणि अशांत मन mind. हे होय .मग मन एकाग्र कसे करावे.
  सर्वप्रथम नैसर्गिकरित्या मनाला विश्रांत करणे अधिक फायद्याचे. त्यानंतर ध्यान meditation, व्यायाम,पोषक आहार, दिवसांचे निरीक्षणे, त्याच बरोबर आवडीचे कार्यक्रम पाहणे,मोकळा संवाद आणि वर्तमानात राहणे. अशा पद्धतीचा वापर केल्यास एकाग्रता टिकण्यास मदत होईल.
      वरील सर्व पद्धती एक meditation नुसार स्वीकारल्या तरच शक्य आहे. परंतु ह्या पद्धतींचा अवलंब करण्यासही वेळ उपलब्ध असावा लागतो,आणि तो मात्र कोणालाच नाही.
     अशावेळी लहान मुलांमध्ये रमा. लहान मुलांत एकाग्रता अफाट असते. त्यांचे मोकळे वावरणे, खोडकर वृत्ती आपल्याला खुपकाही शिकवून जाते. ते कधीच कंटाळत नाही. अशावेळी तुम्ही जर शिक्षक असाल तर अधिक फायद्याचे . लहान मुलांत छान गुण आहे, एखादे काम आवडले की ते कसे पटकन त्याकडे आकर्षिले जातात. वर्गात कितीही गोंधड असो, ते आपल्या कामात मग्न असतात. त्यांच्या कामात कितीही अडथडे येउद्या,त्यांची एकाग्रता भंग होत नाही. 
     लहान मुलांची एकाग्रता भंग न होण्याचे कारण म्हणजे, ते एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करतात. मोठ्यांना तेच जमत नाही.
concentration,motivation,focus,mind,success,ability,art,education,school,
एकाग्रता आणि मानसिक बळ मिळवण्यासाठी लहान मुलांच्या सवयींचा स्वीकार करण्यास हरकत नाही.
लहानपण देगा देवा म्हणतात ना त्याप्रमाणे.
एक गम्मत म्हणजे आज mobile ने सर्वांनाच एकाग्र केले आहे, हे आपण सर्व जण जाणतोय. मग घरात असो की गर्दीच्या रस्त्यावर mobile वरून नजर हटे ना...ही थोडी वेगळीच एकाग्रता आहे? ती स्वीकारावी का? हे तुमच्यावर अवलंबून आहे.
     मानसिक बळ वाढवण्यासाठी एकावेळी एकाच कामावर लक्ष द्यावे व ते पहिले पूर्ण करावे. आपले target ठरवा. सुरूवातीला छोटे,छोटे target ठरवा. छोटी कामे छोटी असल्यामुळे ती सहज वेळेवर पूर्ण होतील. त्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळत जाईल. नंतर मोठी target पार करण्यास तुम्हाला प्रोत्साहन मिळत जाईल.
  एक आनंदी, मजेदार,आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी.... एकाग्रता वाढवूया. जमलच तर आपण पुन्हा लहान होऊया.

लेख कसा वाटला हे नक्की comment करून सांगा.  अशी अजून माहिती वाचण्यासाठी..
     www.photoarticleworld.blogspot.com या blog ला भेट द्या.
          

Wednesday, November 20, 2019

कौशल्य.....कला जोपासण्याचे.. skill...to cultivate art

कौशल्य.... कला जोपासण्याचे :
                               
               प्रत्येक जण आपल्या आवडी-निवडी, वेगवेगळ्या कला Art जोपासत असतो. काही त्या कलेत अधिक निपुण असतात, तर काही एक विरंगुडा म्हणून कलेशी जोडलेले असतात. काही जण त्या कलेला कौशल्याशी जोडतात. मागील लेखात आपण आशावादी असण्याचे फायदे जाणून घेतले. तुम्ही आशावादी असाल तर यश तुमच्या जवळच आहे....
art,skill,school,edu,motivation,life,happy,learn,know,photography,training,
   
  तुमच्या अंगी वेगवेगळे कला, कौशल्य असतील तर 'रिकामं मन शैतानच घर' असे कधीच होऊ देणार नाही. काहीच काम नसेल तर आपण कंटाळतो, जावं कुठे? करावं काय? असे मनात प्रश्न उद्भवतात. अशावेळी तुम्हाला कलेची आवड असेल..  जसे... वाचन, लेखन ,गायन ,चित्रकला , रंगकाम , photography , संवाद  अशा अनेक कलांपैकी एक कला ज्याची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही स्वस्थ बसणार नाही. तुमचा कंटाळा, रिकामा वेळ सहज भरून निघेल.
               कला जोपासणे हे ही एक कौशल्य आहे. बहुतेकदा खूप सार्‍या कला अवगत असतांना कामाच्या व्यापामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी कधीतरी तुम्ही तयार केलेली वस्तु दिसली की तुम्ही त्या दिवसांत हरवून जातात. काय तो क्षण, काय ते दिवस असे विचार मनात घर करतात. कधीतर कलेत निपुण असतांना कौशल्यांच्या कमतरतेमुळे आपले कले कडे दुर्लक्ष होते. वेळ आणि अल्पशा मार्गदर्शनाच्या कमीमुळे आपली कला break घेते. अशावेळी दुर्लक्ष न करता थोडासा सराव आणि वेळ द्या. सराव आणी आवडीमुळे कौशल्य आत्मसात होतील.
            बहुतेकदा कलेचे प्रशंसक नसल्यामुळे ही कलेकडे दुर्लक्ष होते. पण प्रशंसक नसणे हा फार मोठा issue नाही. कला ही एक आवड आहे, जी आपल्या अंतर्गत गुणांचा खजिना आहे. जे आपल्याला जमतेय ते इतरांना जमत असेल का? यात ही एक positive पणा ठेवावा. 
        कलेतील कौशल्य अनेकांकडे असतात. फक्त हे कौशल्य वाढीस लावण्यासाठी इतरांपेक्षा वेगळे असावे लागते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शोधक वृत्ती, निरीक्षण कौशल्य, आवश्यक अभ्यासाचा वापर आपल्या कलेत करता येणे अतिशय गरजेचे आहे. तुमच्यातील कलेतील कौशल्य, संकल्पना तुम्हाला उत्कृष्ठपणे मांडता येणे जास्त महत्वाचे असते. कारण केवळ चांगले ज्ञान असून चालणार नाही, त्यासोबत कौशल्यची गरज आहे. परीक्षेत चांगले गुण मिळतात परंतु कौशल्यांचा अभाव असल्याने जीवनात खच्चीकरण होते. 
       म्हणून आनंदासाठी का होईना कौशल्याची जोड द्या. मग पहा.....
                                          एखादी उत्तम लहानशी गोष्ट 
                                          आपण दररोज करत राहिलो,
                                         तर त्या गोष्टीचे कालांतराने 
                                          मिळणारे फळ.....
                                                         महाकाय असते.
art,skill,school,education,motivation,moral,lifestyle,tech,photography,

   बालपणातील किंवा शालेय जीवनातील स्वत: बनवलेले एखाद चित्र, गायलेले गाणं, केलेलं नृत्य, बनवलेली creative वस्तु यांचा शोध घ्या. त्यावस्तू किंवा त्या क्षणाची आठवण जरी केली की तुम्ही बालपणात हरवले म्हणा.
    कला जोपासण्यासाठी ठराविक वयाची मर्यादा नाही. उदाहरण घेतले तर धुळे जिल्ह्यातील मूर्तिकार श्री. राम सुतार [ram v. sutar]  ज्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी जागतिक स्तरावर देशाची मान आणि कीर्तिमान उंचवण्याचे काम केले.  [ statue of unity ] हे त्यांच्या हातून निर्मिती झाले. ज्या वयात शरीराला आराम हवा असतो, अशा वयात ही कलेची आवड अत्यंत कौशल्याने जोपासली, त्या कलेने त्याना मान, सन्मान मिळवून दिला.
        तुमचे वय काहीही असो, कलेची आवड असेल तर जोपासा. थोडसं कौशल्या पणाला लावा, थोडं मेहनत घेऊ शकत तर त्या क्षेत्रात career ही करू शकता. त्यातून कला जोपासलीही जाईल, आनंद ही मिळेल.


लेख कसा वाटला comment करून नक्की सांगा...